खुशाल ओढा विडी-सिगारेट, एकावरही कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:02+5:302020-12-29T04:17:02+5:30

दंड करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला आहेत. शिवाय बसस्थानक परिसरात आगारप्रमुखाला, शाळा परिसरात मख्याध्यापकांना कॉलेज परिसरात प्राचार्याला ...

Khushal Odha VD-Cigarette, no action on any | खुशाल ओढा विडी-सिगारेट, एकावरही कारवाई नाही

खुशाल ओढा विडी-सिगारेट, एकावरही कारवाई नाही

दंड करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला आहेत. शिवाय बसस्थानक परिसरात आगारप्रमुखाला, शाळा परिसरात मख्याध्यापकांना कॉलेज परिसरात प्राचार्याला हे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु महापालिका क्षेत्रात शाळा किंवा बसस्थानक परिसरात खुलेआम सिगारेट आणि गुटख्याची विक्री केली जाते. या ठिकाणी रस्त्यावरच उभे राहून कशवर कश मारत हवेत धूर सोडण्यात येतो. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्यांना पकडून दोनशे रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. परंतु अद्याप हवेत सिगारेटचा धूर सोडणार्यांवर कारवाईचा प्रशासनाला विसर पडल्याचेच दिसून येत आहे.

प्रशासनाकडून सार्वजिनक ठिकाणी मात्र धुम्रपान केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे इशारे देणारे बोर्ड जागोजागी लावण्यात आले आहेत. परंतु या बोर्डाजवळ उभे राहूनच अनेकजण सिगारेटची आपली तल्लफ भागवितात.

परंतु सिगारेटची तल्लफ असणार्यांचा निर्व्यसनी व्यक्तीला मात्र मोठ्या प्रमाणात त्रास होतो. बसस्थानक परिसरात तर एसटीत इतर प्रवाशांसोबत बसलेले महाभाग खिडकीतून बाहेर तोंड काढून सिगारेट ओढत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Khushal Odha VD-Cigarette, no action on any