Keep jewelry away; If not, then the prize will not get | दागिने काढून ठेवा; नाही तर बक्षीस मिळणार नाही
दागिने काढून ठेवा; नाही तर बक्षीस मिळणार नाही

ठळक मुद्देमहिलेला गंडविले पंधरा हजार रुपयांचे दागिने लंपास

नांदेड : गोकुळनगर भागातील महालक्ष्मी आॅईल शो रुमच्या समोर एका महिलेला अडवून तिच्याजवळील पिशवीची अदलाबदल करुन १५ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली़ आमच्या मालकाला मुलगा झाला आहे़ त्यामुळे ते गरीब महिलांना बक्षीस वाटप करीत आहेत़ आपणही या पण तुमच्याजवळील दागिने काढून ठेवा़ असे म्हणत भामट्याने महिलेला गंडा घातला़
मंगळवारी दुपारी आंबेडकरनगर भागातील महिला रमा महादळे ही कामानिमित्त गोकुळनगर भागात आली होती़ महालक्ष्मी आॅईल शो रुमच्या समोर त्या आल्या असताना समोरुन आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडविले़ रस्त्याच्या कडेला नेले़ आमच्या मालकांना मुलगा झाला आहे़ त्यामुळे खूप खूश होवून ते गरीब महिलांना बक्षीस वाटप करीत आहेत़ तुम्ही तुमच्याजवळचे दागिने काढून पिशवीत टाका अन् दुकानासमोर या, तुम्हालाही बक्षीस मिळेल असे सांगितले़
बक्षीस मिळणार या आमिषाने महिलेने कानातील, गळ्यातील व रोख ५०० रुपये एका पिशवीत टाकले़ त्याचवेळी आरोपीने महिलेजवळच्या पिशवीची अदलाबदल केली़ त्यानंतर महिला समोर गेली असताना तिथे कुणीही दुकानदार बक्षीस वाटप करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ पिशवीतील दागिनेही गायब झाले होते़
त्यानंतर परत महादळे या आॅईल शो रुम समोर आल्या़ परंतु चोरटा पसार झाला होता़ ही बाब कुटुंबियांना कळविल्यानंतर सायंकाळी या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदरील भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत़


Web Title: Keep jewelry away; If not, then the prize will not get
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.