शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

‘केबीसी’चा खटला जलदगतीने चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:27 AM

केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांचे शासनाला साकडे पाच वर्षांपासून सुरू आहे खटला

नांदेड : केबीसी या नाशिकच्या कंपनीचे मालक व संचालकांनी राज्यभरातील हजारो नागरिकांचे करोडो रूपये जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी मागील पाच वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू आहे. हा खटला जलदगतीने चालवून गुंतवणूकदारांना रक्कम परत करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी शासनाकडे केली आहे़यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केबीसी कंपनीचे मुख्य मालक व संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व कविता चव्हाण तसेच इतर १३ संचालकांनी मिळून १ हजार ३२ करोड रूपये जमा करून एजंटांना ८५३ कोटी कमीशन देवून व कंपनी बंद करून सिंगापूरला पळून गेले होते़ त्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या होत्या़ शासनाने निर्णय घेवून नाशिकच्या आयुक्तांनी सर्व रक्कम जप्त करून आपल्याकडे सुरक्षित ठेवली आहे़२०१४ पासून ही रक्कम अडकून पडली आहे़ त्यामुळे गुंतवणूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे़ कंपनी संचालकाविरूद्ध नांदेड, परभणी अशा २२ ठिकाणी न्यायालयात गुन्हे दाखल केलेले आहेत़ त्यामध्ये सर्व १४ आरोपी अद्याप हजर झालेले नाहीत़ न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे़ शासनाने हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी मंजुरी दिली आहे़ मात्र त्याचा उपयोग होत नसल्याचे गुंतवणूकदारांनी निवेदनात म्हटले आहे़समिती गठीत करण्याची गुंतवणूकदारांची मागणीशासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी मंजुरी दिली असली तरी त्याचा उपयोग होताना दिसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे़ शासनाने केबीसी कंपनीची रक्कम परत करण्यासाठी समिती गठित करावी, तसेच २२ ठिकाणी सुरू असलेले खटले नांदेडमध्ये जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी मागणी केली आहे़ निवेदनावर स़ गगनसिंघ, कालुसिंघ गाडीवाले, महिंद्रसिंघ रागी, बाबूसिंघ कारपेंटर, हरमीतसिंघ निर्मले, महिंदसिंघ पैदल, गोविंदसिंघ विष्णूपुरीकर, मोहनकौर भोसीवाले आदी गुंतवणूकदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत़

टॅग्स :NandedनांदेडMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी