शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एकमेव कंधारचे लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र अंबाजोगाईला हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:10 IST

लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते.

कंधार (जि.नांदेड) : राज्यातील एकमेव असलेले कंधार तालुक्यातील गऊळ येथील लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

१६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे. लाल कंधारी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धन करण्यासाठी अंबेजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लाल कंधारी हा मराठवाडा विभागात सर्वत्र आढळणारा देशी गोवंश आहे. त्याचे मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधार मानले जाते. कंधार, लोहा, मुखेड, बिलोली तसेच परभणी जिल्ह्यातील पालम, गंगाखेड तालुक्यात या गायीचे पालन करतात. संपूर्ण लाल रंग, मस्तक मध्यम आकाराचे, डोळे लांबट व काळे, नाकपुडी काळी, लहानसर, दुधाची शीर स्पष्ट व सरळ असते. कातडी अत्यंत चमकदार व खूर करड्या रंगाचे व टणक असतात.

परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता गफूर व माजी आमदार केशवराव धोंडगे यांनी भारत सरकारकडे पाठपुरावा करून लालकंधारी जात ही इतर पशुधनापेक्षा वेगळी असल्याची मान्यता मिळविली. या पशुधनाचा शास्त्रीय पायाभूत विकास व्हावा आणि पशु मालकाला आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यातील एकमेव लाल कंधारी गोसंवर्धन केंद्राची स्थापना गऊळ येथे करण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शंकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. लाल कंधारी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून, सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. या स्थानिक जातींचे वैशिष्ट्ये म्हणजे सदर जाती या दूध उत्पादन व नर पशुधन शेती कामासाठी उपयुक्त आहेत.

मुख्यमंत्र्यांना भेटणारजिल्ह्याचे वैभव असलेले लाल कंधारी गोसंवर्धन केंद्र कै. भाई डॉ. केशवरावजी धोंडगे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्याचे काम केले. तब्बल ९ ते १० वेळेस येथील गाय व वळूला राष्ट्रीयस्तरावर गौरविण्यात आले. अशी पार्श्वभूमी असल्याने कंधार तालुक्यातील गऊळ येथे संवर्धन केंद्र स्थापन केले होते; पण पाहिजे तेवढा निधी मिळाला नव्हता. आता हे केंद्रच हलविण्यात आले. त्यांचा मी निषेध करतो. याकरता पाठपुरावा करणारा असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री यांची भेट घेणार आहे. - ॲड. मुक्तेश्वर केशवराव धोंडगे, शिवसेना नेते.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडDhananjay Mundeधनंजय मुंडे