शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

कॉफी शॉपवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 1:03 AM

शहरानजीक पावडेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत कॉफी शॉपचे पेव फुटले असून कॉफी शॉपच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वीच पंधरा कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ त्यानंतर शनिवारी छत्रपती चौक भागात एका कॉफी शॉपवर तीन जोडपे अश्लील चाळे करीत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी त्या ठिकाणी धाड मारली़ यावेळी कॉफी शॉपमधील चित्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला़

ठळक मुद्देसरपंचासह ग्रामस्थांनी मारली धाड : तीन जोडप्यांना पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरानजीक पावडेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत कॉफी शॉपचे पेव फुटले असून कॉफी शॉपच्या नावाखाली या ठिकाणी अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे़ याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वीच पंधरा कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ त्यानंतर शनिवारी छत्रपती चौक भागात एका कॉफी शॉपवर तीन जोडपे अश्लील चाळे करीत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी त्या ठिकाणी धाड मारली़ यावेळी कॉफी शॉपमधील चित्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला़शहरात सर्वच भागात सध्या मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये तर कॉफी शॉपची मोठी क्रेझ आहे़ घरातून महाविद्यालय किंवा खाजगी शिकवणीला जाते म्हणून तरुण मुले-मुली तासन्तास या कॉफी शॉपमध्ये बसून अश्लील चाळे करीत असल्याचे मागील काही दिवसांतील घटनांवरुन स्पष्ट झाले़ मंद प्रकाश असलेल्या या कॉफी शॉपमध्ये कॅबिनची व्यवस्थाही करण्यात आली आहे़काही ठिकाणी तर चक्क बेडही आढळले होते़ त्यानंतर पावडेवाडी ग्रामपंचायतने अशा १५ कॉफी शॉपचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता़ ग्रामपंचायतच्या या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले होते़ परंतु, त्यानंतरही छत्रपती चौकात अनधिकृतपणे एका कॉफी शॉपमध्ये असा प्रकार सुरुच होता़ शनिवारी सरपंच बंडू पावडे, भाजपाचे मिलिंद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बंडू पावडे यांना ही माहिती मिळाली़ त्यानंतर ग्रामस्थांसह त्यांनी कॉफी शॉपवर धाड मारली़ यावेळी कॉफी शॉपमध्ये तीन जोडपे अश्लील चाळे करीत होते़ धाडीवेळी हे जोडपे नको त्या अवस्थेत होते़त्यानंतर भाग्यनगर पोलिसांना ही माहिती देण्यात आली़ या तीनही जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ त्याचदरम्यान कॉफी शॉपचा चालक मात्र पळून गेला़ या कॉफी शॉपमध्ये बसण्यासाठी मोठ्या आकाराचे सोफे ठेवण्यात आले होते़ दोन सोफ्यांमध्ये आडोशाचीही व्यवस्था करण्यात आली होती़ त्याचबरोबर या ठिकाणी काही आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या़दरम्यान, पोलिसांनी तीनही तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडून दिले असून तरुणींच्या कुटुंबियांना ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले़ या प्रकारामुळे शहरातील कॉफी शॉपवर सुरु असलेले हे भलतेच प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत़दरम्यान, शहरातही अनेक कॉफीशॉप, हॉटेलांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जादा शुल्क आकारले जात आहे. ही जादा शुल्क आकारणी नेमकी कशासाठी असते? याचा शोध पोलिसांच्या दामिनी पथकाला घ्यावा लागणार आहे.

काही पालकांनीच या कॉफी शॉपबाबत तक्रारी केल्या होत्या़ त्यानंतर ग्रामपंचायतने पंधरा कॉफी शॉप बंद केले होते़ त्यानंतरही अनधिकृतपणे हे कॉफी शॉप सुरु होते़ त्यामुळे तरुण-तरुणींनी अवैध प्रकारांना खतपाणी घालणाऱ्या कॉफी शॉपमध्ये जावू नये, असे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे़

कॉफी शॉपमध्ये तासाला ३२० रुपयेकॉफी शॉपमध्ये तरुण-तरुणींना बसण्यासाठी तासाला ३२० रुपये आकारण्यात येत होते़ या ठिकाणी रजिस्टरच्या नोंदीवरुन तर काही जोडप्यांचे बिल चक्क दोन हजार रुपयांपर्यंत झाले होते़ याचा अर्थ दिवसभर हे जोडपे या शॉपमध्ये बसून होते़ तर दुसरीकडे शॉपमध्ये असलेले कॉफी बनविण्याचे साहित्य धूळखात पडलेले, हे विशेष! गेल्या कित्येक महिन्यांपासून या ठिकाणी कॉफी किंवा अन्य कोणतेही पदार्थ बनविण्यात आले नव्हते हे त्यावरुन स्पष्ट होते़ त्यामुळे अवैध प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठीच हे कॉफी शॉप सुरु करण्यात आल्याचे दिसून येते़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस