पोलिसाचे घरफोडून दागिने लंपास; नांदेडमध्ये चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 15:09 IST2023-04-04T15:09:05+5:302023-04-04T15:09:15+5:30
यात्रेनिमित्त मुळगावी कुटुंबासह गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरी

पोलिसाचे घरफोडून दागिने लंपास; नांदेडमध्ये चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान
नांदेड: चोरट्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याचे घरफोडून कपाटातील सुमारे १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ३ मार्च रोजी शहरातील क्रांती चौक भागात उघडकीस आली.
नांदेड पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेले रामदयालसिंह ठाकूर यांचे नांदेडच्या सिडको वसाहतीतील एनडी-२ (क्रांतीचौक परिसरात) निवासस्थान आहे. पांगरा (ता. कंधार) या मुळगावी यात्रा असल्याने ठाकूर पत्नी व मुलांसह तिकडे गेले होते. ३ एप्रिल रोजी सकाळी ठाकूर मुलासह निवास्थानी परत आले. त्यावेळी, त्यांना गेट व घर उघडे दिसले. पाहणी केली असता कपाटातील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रामदयालसिंह बंकटसिंह ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गोविंद जाधव पुढील तपास करत आहेत.