शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्याची आली वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:02+5:302021-02-05T06:11:02+5:30

चौकट- शाळा सुरू झाल्यापासून आम्ही दररोज विद्यार्थ्यांचे ऑक्सिमीटरने तापमान मोजत असून, त्याच्या नोंदी वहीत ठेवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मास्क ...

It was time for teachers to measure students' temperatures | शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्याची आली वेळ

शिक्षकांवर विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्याची आली वेळ

चौकट- शाळा सुरू झाल्यापासून आम्ही दररोज विद्यार्थ्यांचे ऑक्सिमीटरने तापमान मोजत असून, त्याच्या नोंदी वहीत ठेवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मास्क नाही, त्यांना मास्क बांधण्याविषयी सूचना देत आहोत. एक दिवस मुली व एक दिवस मुले असा दिनक्रम ठरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर राहण्यास मदत होईल. हे काम करताना कोणतीही दमछाक होत नाही. - शिवा कांबळे, जि. प. शाळा, मालेगाव, ता. अर्धापूर

चौकट- ग्रामीण भागातील विद्यार्थी कोरोनाविषयी जागरूक आहेत. आम्हाला दिलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे दररोज विद्यार्थ्यांचे तापमान मोजूनच त्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहावे म्हणून त्यांना दूर दूर बसविले जात आहे. असे असले तरी विद्यार्थी आनंदी आहेत. - जगजितसिंह ठाकूर, जि. प.शाळा वडगाव, ता. नांदेड

चौकट- पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे आम्हाला जास्त जागरूक राहावे लागणार आहे. त्यादृष्टीने आम्ही वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्याचा अहवाल देत आहोत. शिक्षकांवर ही अधिकची जबाबदारी असली तरी जागरूकपणे ती पार पाडत आहेत. विद्यार्थ्यांना शिकविताना आनंद मिळत आहे. - दत्तप्रसाद पांडागळे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, वाडीपुयड, ता. नांदेड

Web Title: It was time for teachers to measure students' temperatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.