शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

देशातील राजकारणाची हवा बदलत असून याची नोंद घेण्याची वेळ आली आहे : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 6:28 PM

चार राज्याच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा बदलत्या हवेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देदेशावर संकटाची परिस्थितीबैठकीला सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी अनुपस्थित 

नांदेड : राजकारणाची हवा मला कळते, असे सांगत देशात आता हवा बदलत असून चित्र बदलत आहे. या नव्या बदलाची नोंद घेण्याची वेळ आली आहे. याबाबत आपल्या मनात शंका नसून ही काही वावटळ नसून ही जनमाणसातील, लोकांच्या मनातील भावनांच्या पूर्ततेबाबत चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांचे निकाल हे बदलत्या हवेचे द्योतक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले़

नांदेड येथे जिल्हा बँकेत उभारण्यात आलेल्या पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण होते़ यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी खा. तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी, देशातील राजकारणाची हवा शरद पवारांना कळते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, अशी आठवण केली. त्याचा संदर्भ देताना खा़ पवार म्हणाले, आपल्याला राजकारणाची हवा कळते, आता देशाची हवा बदलत आहे़ या बदलत्या हवेची नोंद घेण्याची वेळ आली आहे. झालेल्या चार राज्याच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल हा बदलत्या हवेचे द्योतक असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशावर संकटाची परिस्थितीदेशात सध्या संकटाची परिस्थिती असल्याचे सांगितले़ पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले़ या हल्ल्यात देशाने जबरदस्त किंमत दिली असल्याचेही ते म्हणाले़ त्यातच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीही नुकतेच एक वक्तव्य करून जणू चिथावणी देण्याचेच काम केले आहे़ अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी एकजुट दाखवण्याची गरज आहे़ देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. 

बैठकीला सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी अनुपस्थित केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला आम्ही सर्व कामे सोडून उपस्थित राहिलो़ या बैठकीत एक ठरावही घेण्यात आला़ राजकारणात मतभेद असतील, पण देशाच्या रक्षणासाठी आम्ही सर्व एक आहोत़ सरकारच्या बरोबर आहोत, असा ठराव घेण्यात आला़ केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला सत्ताधारी पक्षाचेच प्रतिनिधी हजर नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे बैठकीला उपस्थित होते़ मात्र ते मंत्री म्हणून उपस्थित होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNandedनांदेडBJPभाजपा