खड्डा चुकवला पण कठडे तोडून ट्रक पुलावर अडकला, सुदैवाने जीव वाचला
By प्रसाद आर्वीकर | Updated: August 25, 2023 12:23 IST2023-08-25T12:22:09+5:302023-08-25T12:23:47+5:30
नांदेड- बिदर या राष्ट्रीय महामार्गावर कंधारजवळ रस्त्याचे काम अर्धवट आहे.

खड्डा चुकवला पण कठडे तोडून ट्रक पुलावर अडकला, सुदैवाने जीव वाचला
- मारोती चिलपिपरे
कंधार :नांदेडहून उदगीरकडे हरभरा घेऊन जात असलेला एक ट्रक मन्याड नदीच्या पुलावर कठडे तोडून पुलाच्या मधोमध अडकला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे २४ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, कठड्यांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
नांदेड- बिदर या राष्ट्रीय महामार्गावर कंधारजवळ रस्त्याचे काम अर्धवट आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. २४ ऑगस्ट रोजी रात्री एम.एच. २६ एडी २७१३ या क्रमांकाचा ट्रक हरभरा घेऊन नांदेडवरून कंधारकडे जात होता. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बहाद्दरपुरा येथे मन्याड नदीवर पुलाच्या अलीकडे हा ट्रक आला. तेव्हा रस्त्यात मोठे खड्डे होते. एका खड्ड्यातून ट्रक वर आल्यानंतर काहीतरी आवाज झाल्याने चालक पाठीमागे पाहत होता. त्याचवेळी त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. कठड्यांमुळे तो खाली नदीपात्रात पडला नाही. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली आहे.