शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पार्डी नदीला इसापूर धरणाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:55 IST

सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़

ठळक मुद्देएक दलघमी पाणी दोन दिवसांत पोहोचणार सांगवी बंधाऱ्यात

पार्डी : सांगवी बंधाऱ्यासाठी इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले असून हे पाणी २६ फेब्रुवारीला पार्डी नदीत पोहोचले होते़ येत्या दोन दिवसांत हे पाणी सांगवी बंधाºयात पोहोचणार आहे़ या पाण्यामुळे पार्डी गावचा पाणीप्रश्न सुटला आहे़सांगवी बंधाºयात इसापूर धरणाचे पाणी पोहोचणार आहे़ त्यानंतर काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून सदर पाणी उत्तर नांदेडला पुरविले जाणार आहे़ विष्णूपुरी धरणात ६० दिवस पुरेल इतकाच जलसाठा उरला होता़ नांदेडकराची तहान भागविण्यासाठी इसापूर धरण्याच्या पाण्याची मागणी वाढली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी इसापूर धरणातून दोन दलघमी पाण्याची मागणी केली होती़ त्याकरिता एक दलघमी पाणी सांगवी बंधाºयात सोडण्यात आले आहे़ हे पाणी निमगाव येथील मेन कॅनलद्वारे पार्डी नदीच्या पात्रात २६ फेब्रुवारी रोजी रात्री सोडण्यात आले़ हे पाणी २८ फेब्रुवारी रोजी सांगवी बंधाºयात पोहण्याची शक्यता आहे़इसापूर धरण्याच्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यातील पार्डी, शेणी, कामठा बु, कामठा खु़, बामणी, शेलगाव खु़, शेलगाव बु़, सुगाव, सांगवी, मेढला, निजामपूरवाडी, पिंपळगाव व अर्धापूरसह गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून दैनंदिन वापरासाठी नदी-नाल्याशेजारी ग्रामपंचायतकडून सार्वजनिक विहीर व बोअर बांधण्यात आल्या आहेत़ विहीर व बोअर उन्हाळ्यात कोरड्या पडल्या होत्या़ नळाला पाणी येत नव्हते़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते़ काही भागातील विहिरीने तळ गाठण्यास सुरुवात केली होती़ या भागातील पिके वाळण्यास सुरुवात झाली होती़ दरम्यान पार्डी गावाच्या नदीपात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्याने या गावातील पिण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़

टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाईwater transportजलवाहतूक