लोह्यात औषधी दुकानात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:25+5:302021-02-05T06:10:25+5:30

जिल्ह्यात चार दुचाकी चोरीला जिल्ह्यात हदगाव, उमरी, विमानतळ आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दुचाकी लंपास करण्यात आल्या. दत्ता ...

Iron drug store theft | लोह्यात औषधी दुकानात चोरी

लोह्यात औषधी दुकानात चोरी

जिल्ह्यात चार दुचाकी चोरीला

जिल्ह्यात हदगाव, उमरी, विमानतळ आणि वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दुचाकी लंपास करण्यात आल्या. दत्ता नारायण वाघमारे यांची एम.एच.- २६ ए.डब्ल्यू.- ९३४३, राजकुमार वाडपल्लू यांची ए.पी.- २८ डी.बी.- ५९०४, अमोल बाबूराव कोकाटेंची एम.एच.- २६ ए.वाय. १८८२ आणि राजाराम गंगाराम सोळंके यांची एम.एच.- २२ एम.- ४९०६ या क्रमांकाच्या दुचाकी लंपास करण्यात आल्या.

मलशुद्धिकरण केंद्रापुढे खंडणीची मागणी

नांदेड : बोंढार येथील मलशुद्धिकरण केंद्रापुढे २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. अण्णाराव प्रभू जाधव हे साथीदारासोबत मलशुद्धिकरण केंद्रापुढे थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आला. पाच व्यक्ती कामावर असताना दहा लोकांचे मागील सहा वर्षांचे २५ लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. याप्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

तरुणाची गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या

नांदेड : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हस्सापूर पुलावरून गोदावरीत उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना २५ जानेवारी रोजी घडली. या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

विकी राजूसिंह ठाकूर, रा. पाटनूरकरनगर असे मयताचे नाव आहे. २५ जानेवारी रोजी त्याने कोणत्या तरी कारणावरून हस्सापूर पुलावरून पाण्यात उडी मारली होती. या प्रकरणात राजूसिंह ठाकूर यांच्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी नोंद केली.

Web Title: Iron drug store theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.