एकीकरण बचतगटाच्या माध्यमातून होऊ शकते : चंद्रकला चापलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:38+5:302021-02-05T06:09:38+5:30
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगीता श्रीमंगले होत्या, तर प्रमुख उपस्थितीत आशाताई गायकवाड, संजीवनी ...

एकीकरण बचतगटाच्या माध्यमातून होऊ शकते : चंद्रकला चापलकर
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगीता श्रीमंगले होत्या, तर प्रमुख उपस्थितीत आशाताई गायकवाड, संजीवनी काटकर, अलका नीलमवार, योगीता बेळीकर ह्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलित करून पुष्पहार प्रमुख उपस्थितांच्या हस्ते घालून राष्ट्रसंत सेना महाराज सभागृह कौठा येथे झाली. प्रमुख उपस्थित महिलांनी आपले विचार मांडले. नंतर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री शिंदे यांनी केले, तर प्रास्ताविक बालामनी चिन्नूरकर यांनी केले. शेवटी आभार भाग्यश्री पवार यांनी मानले.
यशस्वीतेसाठी अश्विनी श्रीमंगले, सिंधूजा चिन्नूरकर, निकिता श्रीमंगले, रंजिता संजीवनकर, अलका बोखारे, लक्ष्मीबाई चापलकर, सुरेखा रासवते, दीपा सोनटक्के, आशा वाघमारे, अनिता घुळघुळे, संध्या भालेराव, संतोषी भाले, कमलाबाई शिंदे, अंतसरा वाघपावन, अरुणा जाधव, सिंधू भालेराव आदींनी प्रयत्न केले.