शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पालक सचिवांनी केली पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:02 IST

पालकसचिव तथा राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील सलगरा, अखरगा येथील शिवारात भेट देवून पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देनियोजन भवनमध्ये बैठकटंचाई गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पालकसचिव तथा राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी शुक्रवारी मुखेड तालुक्यातील सलगरा, अखरगा येथील शिवारात भेट देवून पिकांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेऊन टंचाईग्रस्त गावांतील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.डवले यांनी मुखेड तालुक्यातील सलगरा, आखरगा शिवारात जावून पीकपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदींसह अधिकारी, पदाधिका-यांची उपस्थिती होती. सलगरा येथे ज्वारी, कापूस, तूर पिकांची पाहणी केल्यानंतर डवले यांनी शेतकºयांशीही संवाद साधून पिकांच्या नुकसानीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, पाटबंधारे मंडळाचे एस. बी. सब्बीनवार, नांदेड पाटबंधारे विभागाचे आर. एम. देशमुख आदींसह अधिका-यांची उपस्थिती होती.

  • राष्टÑीय पेयजल कार्यक्रमातील कामांना वेग देण्याची आवश्यकता व्यक्त करीत टंचाई गावांतील कामांना प्राधान्याने पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानातंर्गतची तसेच प्रत्येक योजनांची कामे येत्या डिसेंबरपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश देत जलयुक्त शिवार कामाचा त्यांनी आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा योजनांचा फायदा शेतक-यांना झाला पाहिजे यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डवले यांनी केले.

नांदेड जिल्ह्यात यंदा सुमारे ७९ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असली तरी काही तालुक्यांत अत्यल्प पाऊस झालेला आहे. या ठिकाणची पिके वाळून गेल्याने शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीFarmerशेतकरी