स्कूल बसचे वाढले भाडे; शाळांनीही लावला शुल्कासाठी तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:11+5:302021-02-06T04:31:11+5:30

चौकट- विद्यार्थ्यांची शाळेला ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालकांनी वाढत्या तेलाच्या किमती व मागील आठ, नऊ महिन्यांपासून वाहने बंद असल्याने बुडलेला ...

Increased school bus fares; Schools also demanded fees | स्कूल बसचे वाढले भाडे; शाळांनीही लावला शुल्कासाठी तगादा

स्कूल बसचे वाढले भाडे; शाळांनीही लावला शुल्कासाठी तगादा

चौकट- विद्यार्थ्यांची शाळेला ने-आण करणाऱ्या स्कूल बसचालकांनी वाढत्या तेलाच्या किमती व मागील आठ, नऊ महिन्यांपासून वाहने बंद असल्याने बुडलेला रोजगार यामुळे स्कूल बसचालकांनी नेहमीच्या दरात वाढ केली आहे. एका विद्यार्थ्यासाठी ६०० रुपये शुल्क असताना आता एक हजार रुपये शुल्क स्कूल बसचालक मागत आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना स्वत: शाळेत घेऊन जात आहेत.

चौकट- कोरोना काळात खासगी नोकरी हातची गेली. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले. कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न असतानाच आता मुलाचे स्कूल बसचे भाडे व शाळेची फी कशी भरायची, अशी चिंता आहे. शाळांनी शैक्षणिक शुल्क कमी करणे गरजेचे आहे. - सदानंद बुक्तरे, सिद्धांतनगर, नांदेड

Web Title: Increased school bus fares; Schools also demanded fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.