शाळा, अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:00+5:302021-02-06T04:31:00+5:30

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, विभागीय कार्यालयाचे उपायुक्‍त ...

Increase public participation for empowerment of schools and anganwadas | शाळा, अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढविणार

शाळा, अंगणवाड्यांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढविणार

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, विभागीय कार्यालयाचे उपायुक्‍त सुरेश बेथमुथा, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा परिषद सदस्‍या अरुणा कल्‍याणे, प्रकाशराव भोसीकर, भीमराव कल्‍याणे, उपविभागीय अधिकारी राजेंद खंदारे, सहआयुक्‍त वैशाली रसाळ, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, तहसीलदार दिनेश झांबले, गटविकास अधिकारी एम.डी. जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत मुगट येथे वृक्ष लागवड, ग्राम सफाई, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अंतर्गत माझी मुलगी माझा स्‍वाभिमान म्‍हणून मुलींच्‍या नावाच्‍या पाट्या घरावर लावणे, मुलींच्‍या जन्‍माचे स्‍वागत, ओला व सुका कचरा व्‍यवस्‍थापनासाठी प्रतिकुटुंब दोन डस्‍टबिन वाटप, कर भरणा केलेल्‍या ग्रामस्‍थांना पावतीचे वाटप, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्‍तनदा माता व कुपोषित बालकांसाठी देण्‍यात येणारा सकस आहार व गावस्‍तरावरील स्‍वच्‍छतेसाठी शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापनासाठी माहितीचे प्रदर्शन, रक्‍तदान शिबिर आदी भरगच्‍च कार्यक्रम घेण्‍यात आले.

यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन म्‍हणाले, शाळा व अंगणवाडी समृद्ध करण्‍यासाठी लोकसहभाग वाढविण्‍यावर भर द्यावा. त्‍या शाळेतून शिकून पुढे गेलेल्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी शाळेतील विद्यार्थ्‍यांना हातभार लावून हे ऋण फेडावे. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्‍यासाठी शोषखड्डे व पाणी पुनर्भरणाचे कार्यक्रम हाती घेणे आवश्‍यक असल्‍याचेही ते म्‍हणाले.

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी सर्वांच्‍या सोबतीतूनचही मोहीम पुढे जाईल, असे सांगितले. तर मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गाव विकासात शिक्षणालादेखील महत्त्वाचे स्‍थान असून, मुलींना शिक्षणाची संधी मिळाली तर त्‍या स्‍वत:ला सिद्ध करू शकतात. म्‍हणून मुलींच्‍या शिक्षणासाठी पालक व समाजाने विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. यावेळी सुरेश बेथमुथा म्हणाले, प्रत्येकाने आठवड्यातून अर्धातास जरी गावासाठी दिला तर गावे स्‍वच्‍छ होण्‍यास वेळ लागणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार अधिकारी कैलास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी राजेश्‍वर भुरे यांनी केले. कार्यक्रमाला शोभाताई मुंगल, आनंदराव गादीलवाड, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डी. यू. इंगोले, व्‍ही.आर. पाटील. एस.व्‍ही. शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्‍यमिक विभागाचे माधव सलगर, कृषी विकास अधिकारी एस.बी. नादरे, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Increase public participation for empowerment of schools and anganwadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.