धक्कादायक! धावत्या ऑटोत झटापट, प्रवाशावर खंजरने हल्ला
By शिवराज बिचेवार | Updated: May 15, 2023 16:10 IST2023-05-15T16:09:27+5:302023-05-15T16:10:35+5:30
या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धक्कादायक! धावत्या ऑटोत झटापट, प्रवाशावर खंजरने हल्ला
नांदेड- शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑटोत बसलेल्या दोघांनी एका प्रवाशासोबत ऑटोतच झटापट केली. त्यामुळे धावत्या ऑटोतून ते तिघेही जण खाली पडले. यावेळी दोघांनी एका प्रवाशावर खजंरने हल्ला करुन त्यांच्याजवळील रोख ३२ हजार रुपये आणि मोबाईल लांबविला.
ही घटना १३ मे रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.शेरु उर्फ शेरा खुशालसिंह परमार रा.सखोजीनगर हा ऑटोचालक फिरोजखान नावाच्या प्रवाशाला घेवून कृष्णा चौकाकडून जात होता. महाराणा प्रताप चौक येथे ऑटो आला असताना दोघांनी तो अडविला. त्यानंतर दोघे जण ऑटोत बसले. यावेळी दोघांनी फिरोजखान यांच्याशी धावत्या ऑटोतच झटापट सुरु केली. त्यामुळे ऑटोतून ते खाली पडले. त्यानंतर खंजरने फिरोजखान यांच्यावर हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि मोबाईल लांबविला. या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.