शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत

By अविनाश पाईकराव | Updated: September 12, 2024 16:26 IST

चीनची घुसखोरी, मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर प्रधानमंत्री, गृहमंत्री का बोलत नाहीत : संजय राऊत

नांदेड: चीनने भारताचा चार हजार किलोमीटर भाग गिळकृंत केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही ६५ कि.मी. आतपर्यंत चीनच्या सैन्याने घुसखोरी केली आहे. मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असताना हे सरकार राजकारणात अडकून पडले असून देशाचे पंतप्रधान आरत्या करत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

लोहा येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते गुरुवारी नांदेड येथे आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन याबाबत बोलत असले तरी आम्ही महिनाभरापासून हा विषय मांडत आहोत. मणिपूर हातातून गेले आहे. लडाखचा अर्धा भाग चीनने ताब्यात घेतला असून तेथे गावं वसवले आहे. या देशाला संरक्षण मंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री आहेत का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे. लडाखचे सोनम वांगचू हे काही प्रश्न घेऊन लडाखपासून दिल्लीला चालत निघाले आहेत. त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर भाजपाचे नेते, प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री बोलणार नाहीत. तर ते आमच्यावर बोलतील. आमच्यावर टीका करतील. मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर ते का बोलत नाहीत. आमचे ५६ इंची सरकार गप्प बसले असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेतदेशात फाळणीच्या वेळी जी परिस्थिती होती. त्यापेक्षा भयंकर परिस्थिती मणिपूर आसाममध्ये निर्माण झालेली आहे. एका राज्यात मिसाईल चालवले जाताहेत, ड्रोन हल्ले केले जाताहेत. तोफा डागल्या जाताहेत. राज्यपाल पळून जाताहेत. १९६१ ला जेव्हा चीनसोबत युद्ध झाले तेव्हा ईशान्येकडील राज्यातील सरकार पळून गेले. त्याचप्रमाणे आसाममध्ये देखील राज्यपाल आणि सरकार पळून गेले असल्याचेही खासदार संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी