शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार..."; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ

By शिवराज बिचेवार | Updated: July 27, 2024 18:18 IST

आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू.

नांदेडविधानसभा निवडणुकीत क्रॉसवोटींग केल्याचा आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर यांची गेल्या काही दिवसात भाजपाशी जवळीक वाढली आहे. परंतु त्याबाबत उघडपणे त्यांनी आपली भूमिका जाहिर केली नव्हती. शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांची प्रतिनिधी दिसताच त्यांनी आपल्या वाहनाच्या दिशेने पळ काढला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अखेर गाठलेच. यावेळी मी काँग्रेसमध्येच असून चर्चा काय व्हायच्या ते होवू द्या. यावर योग्यवेळी सविस्तर बोलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारात आमदार जितेश अंतापूरकर हे अखेरपर्यंत उतरलेच नव्हते. जिल्हाध्यक्षांनी भेट घेतल्यानंतरही त्यांनी प्रचारापासून अंग काढून घेतले. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला होता. परंतु त्यावेळी कारवाई झाली नाही. त्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉसवोटींग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यात आमदार जितेश अंतापूरकर यांचे नाव आघाडीवर होते. जिल्हा काँग्रेस कमिटीनेही पुन्हा अंतापूरकर यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही निलंबानाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु कारवाईचा चेंडू दिल्लीत गेल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. 

याच दरम्यान आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्याला कारणही तसेच होते. कारण क्रॉस वोटींग केलेल्या आमदारावर काँग्रेसने कारवाई केल्यास महायुती त्यांचे पुर्नवसन करेल असा शब्द देण्यात आला होता. परंतु या सर्व घडामोडींवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी मात्र माध्यमांसमोर येत आपली भूमिका जाहिर केली नव्हती. शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते उशिरानेच सभागृहात दाखल झाले. बैठक आटोपताच सभागृहाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून अंतापूरकर यांनी पळ काढला. बराच अंतर पळाल्यानंतर ते वाहनात बसले अन् पत्रकारांनी त्यांना गाठलेच. यावेळी आरोप हे होत असतातच. माझ्यावरती झालेल्या आरोपावर मी सविस्तर बोलणार आहे. क्रॉस वोटींगच्या आरोपाबाबत पुराव्यानिशी बोलणार असल्याचेही सांगत त्यांनी काढता पाय घेतला.

अशोकराव चव्हाणांशी विकासकामांवर चर्चाअंतापूरकर यांना खासदार अशोकराव चव्हाणांच्या भेटी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते राज्याचे नेते आहेत. त्यांची भेट ही विकास कामांसाठी घेतली होती. त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. मी काँग्रेसमध्येच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा