पहाटेपासूनच अवैध दारू विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:35+5:302020-12-29T04:16:35+5:30

कुंटूर : येथील परिसरातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री सर्रास होत असून, दारू व्यवसायाने धुमाकूळ घातलेला आहे. काही विशिष्ट ...

Illegal liquor sales have been high since early morning | पहाटेपासूनच अवैध दारू विक्री जोरात

पहाटेपासूनच अवैध दारू विक्री जोरात

कुंटूर : येथील परिसरातील अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्री सर्रास होत असून, दारू व्यवसायाने धुमाकूळ घातलेला आहे. काही विशिष्ट वाईन बार, वाईन शॉप, हॉटेल, ढाबा यांमधून बनावट दारूचा महापूर वाहत असल्याचा आरोप मद्यप्रेमींकडून केला जात आहे. एकेका गावात दोन ते तीन, तर कुठे दहा ते बारा दुकाने थाटून अवैध दारू विक्री केली जात आहे.

कुंटूरमध्ये परवानाधारक दुकान एक आहे. सकाळी ६ पासूनच देशी दारू विक्री सर्रास होत आहे. गावात एकूण ११ ठिकाणी देशी दारू विक्री सर्रास होत आहे. तसेच बळेगाव-२, ईजजतगाव-२, सालेगाव-२, ईकळीमोर-२, सुजलेगाव २, रुई बु. १, रुई खु. १, सांगली-२, धनंज -२, राहेर-५, कुंटूर पोलीस ठाणे हद्दीतील ढाबे, हाॅटेल, बियर बारमधून मोठ्या प्रमाणात बनावट अवैध दारू विक्री सर्रास होत आहे.

संबंधित उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्ंयाचे अर्थपूर्ण संबंध असावेत म्हणून विक्री होत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला आहे. परिसरामध्ये अनेक गावांमध्ये व हायवे रोडवरील बियर बार, हॉटेलची बंद व चालू करायची वेळ निश्चित नाही. एक्साइजमधील कार्यरत अधिकाऱ्यांनीच यांना वेळा वाढून दिल्या असाव्यात व त्यासाठी वेगळे गणित असावे, अशी शंका जनतेतून व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनाही चिरीमिरी देत असल्याचेही बार व ढाबेचालकांनी बोलून दाखवले आहे.

एकूणच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्थकारण होऊन या सर्व नियमांची अंमलबजावणी होत नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होते आहे.

कोट

कुंटूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये कुंटूर येथे एकच परवानाधारक देशी दुकान आहे, तर बाकी सर्व दुकाने अवैध आहेत. त्या दुकानांवर लवकरच कारवाई केली जाईल.

- पी. डी. खैलारे, एस. आय. उत्पादन शुल्क विभाग, बिलोली.

Web Title: Illegal liquor sales have been high since early morning