ब्रेक द चेन मध्ये अवैध दारू विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:24+5:302021-04-09T04:18:24+5:30

धर्माबाद येथेही एका इंग्रजी शाळेजवळ अवैध दारू विक्री सुरू हाेती. ७ एप्रिल राेजी पाेलीसांनी धाड टाकून तेथे साठा केलेली ...

Illegal liquor sales continue in Break the Chain | ब्रेक द चेन मध्ये अवैध दारू विक्री सुरूच

ब्रेक द चेन मध्ये अवैध दारू विक्री सुरूच

धर्माबाद येथेही एका इंग्रजी शाळेजवळ अवैध दारू विक्री सुरू हाेती. ७ एप्रिल राेजी पाेलीसांनी धाड टाकून तेथे साठा केलेली १८ हजार ९५० रूपयांची देशी दारू जप्त केली. आराेपीतांविरूद्ध सहा. पाेलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्या तक्रारीवरून धर्माबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धर्माबाद येथेच रेल्वे गेट क्रं. १ जवळ एका बियर बारच्या बाजूला बेकायदेशीररित्या विदेशी दारूची विक्री करण्यात येत हाेती. येथेही पाेलीसांनी धाड टाकत ११ हजार ९७० रूपयांची दारू जप्त केली. पाेहेकाॅ. शेषेराव कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

नविन नांदेडातील ढवळे काॅर्नर ते दुध डेअरी रस्त्यावर गंगा बार समाेर बेकायदेशीररित्या विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. पाेलीसांनी धाड टाकून येथे ४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाेना. शामसुंदर नागरगाेजे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुखेड तालुक्यातील वाघाेबाची खारी येथे विदेशी दारूची विक्री अवैधरित्या केली जात हाेती. पाेलीसांनी धाड टाकून १ हजार ८०० रूपयांचा माल जप्त केला. पाेना. याेगेश महिंद्रकर यांच्या तक्रारीवरून मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहरातील गाेवर्धन घाटकडे जाणाऱ्या रस्त्यावरही ७ एप्रिल राेजी २ हजार २५० रूपयांची विदेशी दारू जप्त केली. अवैधरित्या येथे विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. याप्रकरणी उपनिरीक्षक अमाेल पन्हाळकर यांच्या तक्रारीवरून वजीराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Illegal liquor sales continue in Break the Chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.