शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

'वंचित'कडून प्रस्ताव आल्यास विचार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:29 AM

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात़ परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे़ अद्यापपर्यंत तरी वंचित आघाडीसाठी आमच्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही़

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : स्वीकृत नगरसेवकाची एक जागा 'पीरिपा'ला देण्याची काँग्रेसकडे मागणी

नांदेड : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात़ परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे़ अद्यापपर्यंत तरी वंचित आघाडीसाठी आमच्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही़ अ‍ॅड़ आंबेडकरांनी तसा प्रस्ताव दिल्यास आघाडीसाठी विचार करू, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा़ जोगेंद्र कवाडे यांनी केले़ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू असून दोन जागांची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले़नांदेड येथे मंगळवारी कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी ते बोलत होते़ राज्यात पडत्या काळात आम्ही काँग्रेसची साथ दिली़ आमच्या सोबतीमुळेच नांदेड महानगरपालिकेतही काँग्रेसला बहुमत मिळाले़ त्यामुळे काँग्रेसने स्वीकृत सदस्यांच्या पाच जागेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीला एक जागा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली़ दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकारवर प्राक़वाडे यांनी यावेळी जोरदार टीका केली़ देशात संविधानिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे़ आमच्या कलेनेच वागले पाहिजे असा दबाव निर्माण केला जात आहे़ त्यामुळे देशातील एकसंघतेला धोका निर्माण झाला आहे़ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात महाआघाडी केली जात आहे़डोंबिवली येथे धनंजय कुलकर्णी याच्या दुकानात पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला़ त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली़ दुसऱ्यांदा पोलिसांनी मागणी केली असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ एवढा शस्त्रसाठा सापडूनही न्यायालयीन कोठडी देणे म्हणजे कायद्याचे उल्लंघनच असल्याचे ते म्हणाले़ त्याचवेळी हा साठा एखाद्या दलित अथवा मुस्लिमाच्या घरी सापडला असता त्याला पोलीस कोठडीच दिली असती असे ते म्हणाले़ आरएसएसच्या दसरा शस्त्रपूजनाच्या बाबतीतही सरकार परवानगी देताना भेदभाव करत असल्याचे ते म्हणाले, आम्हाला मोर्चाला परवानगी मिळत नाही ; पण आरएसएसला मात्र शस्त्र मेळावे, शस्त्र प्रदर्शन भरवण्यास खुलेआम परवानगी दिली जाते़ ही बाब गंभीर आहे़यवतमाळमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक, साहित्यिक नयनतारा सहगल यांचेही निमंत्रण ऐनवेळी मागे घेण्यात आले़ हा प्रकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे ते म्हणाले़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे़ एकीकडे आरक्षणही द्यायचे आणि अत्याचारही करायचे ही बाब अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले़ आरक्षण हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही़ सामाजिक अन्याय दूर करण्याची ती तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले़ यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बापूराव गजभारे, गणेश उनवणे, शशीभाई उनवणे, विनोद भरणे, कुलदीप चिकाटे आदींची उपस्थिती होती़

  • ईव्हीएमद्वारे मतदान ही प्रणाली अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने बंद केली आहे़ ईव्हीएमवर नागरिक शंका घेत असतील तर ती निवडणूक आयोगाने बंद करावी व पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणीही यावेळी कवाडे यांनी केली़ ईव्हीएम हॅक करता येते की नाही ? हा प्रश्न संशोधनाचा असला तरी या मशीनवरील शंका मात्र कायम आहे़ ईव्हीएम बंद करण्याच्या मागणीसाठी आम्हीही मोर्चे काढले आहेत़ गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करावी असेही ते म्हणाले़
टॅग्स :NandedनांदेडJogendra kawadeजोगेंद्र कवाडेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण