शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

कमजोर समजू नका, कोणी अंगावर आले तर शिंगावर उचलणार; खासदार अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 19:13 IST

निवडणुकीत मी खोटी आश्वासने देत नाही; मी जे बोलतो ते पूर्ण करून दाखवतो.

हिमायतनगर : आरोप, प्रतिआरोप मी कोणावरही करणार नाही. मला सर्व बाजूंनी घेरले तरीही या चक्रव्यूहातून जनता मला बाहेर काढणार आहे. मला कोणी कमजोर समजू नये; कोणी अंगावर आले तर शिंगावर उचलणार आहे. लाडक्या बहिणीला आमच्या सरकारने लाभ दिला आहे. अतिवृष्टीसाठी ३५ हजार कोटी रुपये आमच्या सरकारने मिळवून दिले आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले.

भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील परमेश्वर बसस्थानक मैदानात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, डॉ. अंकुश देवसरकर, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, तालुकाध्यक्ष गजानन चायल, प्रभाकर मुधोळकर, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, दिलीप पाटील आदींसह नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

खासदार चव्हाण म्हणाले, हिमायतनगर शहराला मूलभूत सुविधांची गरज आहे. शहरात नाल्या नाहीत. रस्ते व्यवस्थित नाहीत, खड्डे आहेत; ते रस्ते दुरुस्त केले पाहिजेत. पाइपलाइन शहरभर लागली पाहिजे. पाणीपुरवठा योजना अर्धवट आहे. ती पूर्ण करण्यात यावी. निवडणुकीत मी खोटी आश्वासने देत नाही; मी जे बोलतो ते पूर्ण करून दाखवतो. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या भ्रमाला बळी न पडता भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांना निवडून द्या आणि आपल्या शहराचा विकास करा. मी सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे. प्रास्ताविक नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Underestimate Me, I'll Retaliate: MP Ashokrao Chavan

Web Summary : Ashokrao Chavan asserted he won't make accusations, emphasizing public support and government benefits for women. He highlighted the need for Himayatnagar's infrastructure development, promising to fulfill commitments if BJP candidates are elected.
टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNandedनांदेड