प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा निर्घृण खून; तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:24 IST2020-08-12T20:23:17+5:302020-08-12T20:24:20+5:30
पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेवून चौकशी केली असता झाला उलगडा

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा निर्घृण खून; तिघे अटकेत
मुदखेड : तालुक्यातील मौजे निवघा येथील गंगाधर सूर्यतळे यांचा अपघाती मृत्यू झाला नसून, पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह दोघांना अटक केली आहे.
७ आॅगस्ट रोजी गंगाधर सूर्यतळे हे पत्नीसह दुचाकीवरून निवघ्याकडे निघाले असताना रस्त्यात अपघात होवून यात गंगाधर सूर्यतळे यांचा मृत्यू झाला. मुदखेड पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू अशी नोंद करुन तपास थांबविला होता, मात्र या घटनेबाबत संशय आल्याने ही घटना अपघात नसून, खून असल्याने काहींनी पोलिसांना पटवून दिले़ याकामी नगरसेवक अॅड. कमलेश चौदंते, पंचायत समिती सभापती बालाजी सूर्यतळे निवघेकर, शिवसेनेचे भोकर विधानसभा प्रमुख विश्वांभर पा. पवार निवघेकर यांनी पोलिसांचे लक्ष वेधले. त्यानंतर पोलीस सकारात्मक झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेवून चौकशी केली असता, प्रियकराच्या मदतीने पती गंगाधर सूर्यतळे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालही तसेच सांगतो. लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सपोनि सुरेश भाले, सहा. पोलीस उपनिरीक्षक यु. डी. बुक्तरे, नापोकॉ ठाकूर तपास लावू शकले, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिली.