शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 18:34 IST

Accident On Asana River Bridge : जखमीस उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) :  नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असना पुलावर ( Asana River Bridge) भरधाव ट्रकने मोटरसायकलला उडवले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तुळशीदास बालाजी पुरी (३४) असे मृताचे नाव आहे. ( Husband dies in accident ) 

तालुक्यातील बराड येथील तुळशीदास बालाजी पुरी याची पत्नी कल्पना आजारी असल्याने दोघे पती-पत्नी दुचाकीवर नांदेड येथे उपचारासाठी जात होते. नांदेड-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर असना पुलावर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ( एम.पि.०९ उएच.एफ.७९३१ ) उडवले. यात ट्रकखाली चिरडून तुळसीदास जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी कल्पना गंभीर जखमी झाली. जखमी कल्पनास उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तुळसीदास यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोनि अशोक जाधव, बळीराम राठोड, माहामार्ग पोनि अरूण केंद्रे, पोउनि ज्ञानेश्वर बसवंते आदींनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, महामार्गचे पोलीस कर्मचारी रमाकांत शिंदे, अंकुश वडजे, महेश कात्रे, गजानन डवरे, ज्ञानेश्वर तिडके,सुभाष अलोने, गणेश शेळके आदींनी जखमीस पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

हेही वाचा -  न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर झाड कोसळले, सुदैवाने कारमधील चारही वकील बचावले

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू