जेवण न दिल्याने हॉटेल चालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST2021-03-08T04:17:59+5:302021-03-08T04:17:59+5:30

नोकराने पळविले दागिने नांदेड : शहरातील स्नेहनगर भागात असलेल्या बी ॲन्ड सी कॉलनीत राहणाऱ्या माधुरी रमेश सोनवणे यांच्या घरातील ...

Hotel driver beaten for not giving food | जेवण न दिल्याने हॉटेल चालकास मारहाण

जेवण न दिल्याने हॉटेल चालकास मारहाण

नोकराने पळविले दागिने

नांदेड : शहरातील स्नेहनगर भागात असलेल्या बी ॲन्ड सी कॉलनीत राहणाऱ्या माधुरी रमेश सोनवणे यांच्या घरातील नोकराने २३ हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. घरामध्ये काम करीत असलेल्या एका महिलाने नोकराने लंपास केल्याची तक्रारी माधुरी सोनवणे यांनी केली. या तक्रारीवरून भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

५० हजारांचे पीक केले लंपास

नांदेड : नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे शेतातील आखाड्यावर ठेवलेले तूर व हरभऱ्याचे ५० हजार रुपयांचे पोते चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ६ मार्च रोजी घडली, या प्रकरणी नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मरवाळी येथील श्रीराम गणेश पवळे यांनी आपल्या शेतातील आखाड्यावर तूर व हरभऱ्याचे काढणी केलेले पोते ठेवले होते. चोरट्यांनी हे पोते लंपास केले. पवळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Hotel driver beaten for not giving food