नांदेडमध्ये अग्नीतांडवात हॉटेल खाक; गर्ल्स हॉस्टेलपर्यंत पोहचली आग, थोडक्यात अनर्थ टळला
By शिवराज बिचेवार | Updated: December 4, 2024 11:36 IST2024-12-04T11:34:37+5:302024-12-04T11:36:38+5:30
हॉटेलसह बाजूच्या मोबाइल शॉपी आणि एका ऑईल शोरूमचे देखील आगीमुळे नुकसान झाले.

नांदेडमध्ये अग्नीतांडवात हॉटेल खाक; गर्ल्स हॉस्टेलपर्यंत पोहचली आग, थोडक्यात अनर्थ टळला
नांदेड : नांदेड शहरातील आनंदनगर भागात आज पहाटे एका हॉटेलला अचानक आग लागली. हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील मुलींचे वसतिगृह, मोबाईल शॉप आणि ऑईल मिलचे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पहाटे पाच वाजेच्या सुमारास हॉटेल नैवेद्यमला ही आग लागली होती. काही वेळातच ही आग हॉटेलच्या वरती पहिल्या माळ्यावर मुलीचे वस्तीगृपर्यंत पोहचली. आगीमुळे वस्तीगृहात मोठया प्रमाणात धूर पसरला होता. अग्मिशमन दलाच्या जवानांनी तातडीने वस्तीगृहातील मुलींना सुखरूप बाहेर काढले. हॉटेलसह बाजूच्या मोबाइल शॉपी आणि एका ऑईल शोरूमचे देखील आगीमुळे नुकसान झाले .. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. यात जीवित हानी झाली नाही. हॉटेल, वसतिगृह, मोबाईल शॉपी आणि ऑईल मिलचे मात्र मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.