तळणी येथे एचआयव्ही तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:29+5:302021-02-05T06:10:29+5:30

छत्रपती चौक भागात सिग्नल बसवा नांदेड : शहरातील छत्रपती चौक भागात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ...

HIV testing at Talani | तळणी येथे एचआयव्ही तपासणी

तळणी येथे एचआयव्ही तपासणी

छत्रपती चौक भागात सिग्नल बसवा

नांदेड : शहरातील छत्रपती चौक भागात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी चार रस्त्यावरून वाहने येतात. या ठिकाणी सिग्नल नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसविण्यात यावे, अशी मागणी विजय बेदरकर यांनी केली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा

नांदेड : मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अरुणा सभागृह, माहेश्वरी मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व ग्रामपंचायतचे अभिलेखे व योजना या विषयावर अजय झरकर तसेच सेंद्रिय शेती ही काळाची गरज या विषयावर सूर्यकांत पोतुलवार हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव महेंद्र देमगुंडे, बालाजी तुप्पेकर, गोविंद गोरे, शिवाजी गोरे, केशव रोडे, पंढरी जायनूरे, गजानन सराेदे, प्रकाश काळे, भास्कर तळणे, विलास काळे, श्रीहरी मुंडकर, पांडुरंग काकडे यांनी केले आहे.

Web Title: HIV testing at Talani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.