शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंग बघा, शेतात किती नुकसान झालंय? चिमुकलीच्या व्हायरल व्हिडिओनं प्रशासन हलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:58 IST

कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक; स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव

नायगाव (जि. नांदेड) : निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांच्या जगण्यावरच घाला येतो, हे आपण अनेकदा पाहतो. अशाच एका संकटात सापडलेल्या नायगाव मतदारसंघातील शेतकरी कुटुंबाच्या वेदना एका चिमुकलीच्या निष्पाप शब्दांमधून व्यक्त झाल्या. कोणीही पाहणी केली नाही अन् काहीही मदत झाली नसल्याची आर्त हाक तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहाेचली. तद्नंतर स्थानिक आमदारांसह अधिकाऱ्यांनी थेट बांधावर धाव घेत पाहणी केली.

पावसाच्या सतत माऱ्यामुळे अनेक गावांतील शेतात पिकांचे नुकसान झाले आहे. आर्थिक संकट तर आहेच, पण त्याहूनही मोठं आहे ते मानसिक ओझं. अशाच परिस्थितीत एका केवळ सहा-सात वर्षांच्या मुलीचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साध्या, सरळ शब्दांत तिने तिच्या घरच्या शेतीतील हाल अपेष्टांची हकिकत मांडली. तिच्या डोळ्यांतील आशा, आवाजातील आत्मविश्वास आणि बोलण्यातली स्पष्टता, हाच तो क्षण होता ज्याने हजारो हृदयं पिळवटून टाकली. सदर व्हिडिओ पाहताच आमदार राजेश पवार हे तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी यांना घेऊन त्या चिमुकलीच्या शेतावर पोहोचले. त्यांनी स्वतः शेतात जाऊन झालेले नुकसान पाहिले आणि शेतकरी कुटुंबाशी मनमोकळा संवाद साधला. पिकांची पाहणी झाल्यानंतर तत्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

चिमुकलीचा भावनिक व्हिडिओ''हिंग बघा, किती नुकसान झालंय? आम्ही वावरात शेंगा पेरल्या होत्या. कोणीच सायब आलं नाही बघायला. एवढ नुकसान झालंय. मोड फुटलेत. नुकसान भरपाई नाय भेटली अजून.'' अशा शब्दात चिमुकलीने प्रत्येक शेतकऱ्याचे दु:ख मांडले. हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन हलले अन् आमदारांसह अधिकारी बांधावर पोहचले. 

चिमुकलीच्या शिक्षणाचा खर्च उचललाआमदार पवार अन् सदर चिमुकलीची बांधावर भेट झाली. यावेळी त्यांनी तिला कडेवर घेत चॉकलेट दिले अन् तिच्याशी गप्पा मारल्या. तुला काय व्हायचं? विचारल्यानंतर तिने लाजतच मला डाॅक्टर व्हायचं, असं उत्तर दिलं. हे ऐकून आमदारही क्षणभर भावुक झाले. जेव्हा तू डॉक्टर होशील, तेव्हा मी तुझ्या घरी परत येईन पेढे खायला, असं म्हणत त्यांनी तिला आशीर्वाद दिले. तसेच मुलगी हुशार आहे, तिला शिकू द्या. कुठलीही अडचण आली, तर मला त्वरित कळवा. तिच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन आमदार पवार यांनी तिच्या पालकांना दिले.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र