शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 3:07 PM

तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली.

नांदेड / परभणी / हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या मतदानात प्राथमिक आकडेवारीनुसार नांदेडमध्ये सुमारे ६५ टक्के मतदान झाले. परभणी आणि हिंगोली मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. परभणीत ५३.७९ टक्के, तर हिंगोलीत सुमारे ५२ टक्के मतदान झाले. ऊन, लग्नसराई आणि मतदारांमधील निरुत्साह यामुळे ही टक्केवारी घसरली. तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. अनेक केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटनाही घडल्या.

तिन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर मतदानाचा उत्साह दिसून आला. मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला. नांदेड मतदारसंघातील बिलोली तालुक्यात एका मतदान केंद्रावरील अनुचित प्रकार वगळता तिन्ही मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले.

नांदेडमध्ये उत्साहमतदारसंघात मतदान यंत्र बिघडण्याच्या घटना घडल्या तसेच दोन गावांत नागरिकांनी दुपारपर्यंत मतदानावर बहिष्कार घातला. बिलोली तालुक्यात मतदान यंत्र फोडल्याचीही घटना घडली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. हदगाव, किनवट तालुक्यामध्ये मतदान यंत्र बंद पडण्याचा आणि बिलोली तालुक्यामध्ये मतदान यंत्र फोडण्याचा प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.

हिंगोलीत टक्का घटलाहिंगोली : हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ ला ६६.५० टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.०३ टक्के मतदान झाल्याने यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसत आहे. येथे सकाळी उत्साह होता; मात्र दुपारी उन्हाचा पारा चढताच मतदारांचा उत्साह मावळला. या मतदारसंघात ३९ मतदान केंद्रांवर मशीन बिघाडाचा प्रकार घडला. कुठे दहा मिनिटे तर कुठे दोन तास मतदान ठप्प राहिले. कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही.

परभणीत उन्हाचा परिणामउन्हाच्या तब्बल ४१ अंश सेल्सिअसवर परभणीकरांनी मात करत परभणी मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७९ टक्के मतदान झाले. एकूण २२९० मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदारसंघातील ११४५ केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आले. यासह ४७ केंद्र संवेदनशील मतदार केंद्रांवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ४८ ठिकाणी बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट बंद पडल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे कुठे अर्धा, तर कुठे एका तास उशिराने मतदानप्रक्रिया सुरू झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

टॅग्स :nanded-pcनांदेडhingoli-pcहिंगोलीparbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४