घरीच घेता येईल रुग्णांना आरोग्य मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:18+5:302021-05-16T04:17:18+5:30
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲपच्या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आली ...

घरीच घेता येईल रुग्णांना आरोग्य मार्गदर्शन
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲपच्या ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकाला ठरावीक दिवस आणि वेळ ठरवून दिलेले असल्यामुळे सर्व संबंधित तज्ज्ञ डॉक्टर या ॲपवर उपलब्ध राहून नागरिकांना सुविधा देणे सुलभ झाले आहे.
ई-संजीवनी ओपीडी ही ऑनलाइन सेवा (https://esanjeevaniopd.in/) या वेबपोर्टलवर किवा अॅन्ड्रॉइड मोबाइल असेल, तर Google Play Store वर esanjeevaniopd या अॅपवर लाभ घेता येईल. ही सुविधा रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध आहे. रुग्णांना एसएमएसद्वारे ई-प्रिस्किप्शन अर्थात त्यांच्या आजारानुसार औषधांची यादी पाठविण्यात येईल. या सुविधेचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले.