बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:42 IST2024-12-14T07:33:20+5:302024-12-14T07:42:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस ...

बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पाच ते सात भीमसैनिक आयसीयू कक्षात शिरले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमाही आणली होती. आरोपीने बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत माफी मागितली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
परभणी प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या बंदोबस्तासाठी परभणीच्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात गुरुवारी रात्री पावणेदहा वाजता पाच ते सातजण आयसीयूमध्ये आले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिस आणि सुरक्षारक्षकांसोबत त्यांचा वाद झाला.
भीमसैनिकांनी बाबासाहेबांची प्रतिमा सोबत आणली होती. आरोपीने प्रतिमेसमोर कान पकडून नतमस्तक होत माफी मागितली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात शुक्रवारी रात्री अज्ञात पाच ते सातजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.