बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात १२५ तक्रारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:16 IST2021-07-25T04:16:55+5:302021-07-25T04:16:55+5:30
नांदेड : कोरोनामुळे गेल्या जवळपास दोन वर्षांपासून अनेक जण घरात अडकून पडले आहेत. आर्थिक विवंचना आणि भविष्याच्या चिंतेने अनेकांना ...

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाकाळात १२५ तक्रारी !
नांदेड : कोरोनामुळे गेल्या जवळपास दोन वर्षांपासून अनेक जण घरात अडकून पडले आहेत. आर्थिक विवंचना आणि भविष्याच्या चिंतेने अनेकांना मानसिक आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे कुटुंबात कुरबुरी वाढल्या आहेत. त्यातूनच महिलांवर पुरुषी अत्याचार वाढले असताना बायकोकडूनही पतीराजांचा छळ होत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. वर्षभरात महिला साहाय्य कक्षाकडे एकूण ४५४ जणांचे अर्ज आले होते. त्यात आश्चर्य म्हणजे १२५ पुरुषांनी बायकोकडून छळ होत असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीवर आता साहाय्य कक्षात सुनावणी सुरू आहे.
डोळ्यात भरली चटणी
पत्नी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करते. खरेदी आणि सोने घेण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीने लाकडाने मारहाण केली. त्यानंतर डोळ्यात चटणी भरल्याची तक्रार पीडित पुरुषाने केली आहे.
तक्रारी वाढल्या
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरूनही पती-पत्नीत वितुष्ट निर्माण होत आहे. त्यामुळे हा विषय काडीमोड घेण्यापर्यंत जात आहे. महिला साहाय्य कक्षात अशी शेकडो प्रकरणे आली आहेत. दोघांचे समुपदेशन करून संसार जुळविण्याचा प्रयत्न केला जातो.
- स.पो.नि. अशोक कोलते
आर्थिक टंचाई आणि अतिसहवास
कोरोनामुळे सर्वांचेचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात दररोज एकमेकांसमोर अधिक वेळ राहत असल्याने एकमेकांच्या चुका काढण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातून वाद होत आहेत. याच वादातून मग काडीमोड घेण्यापर्यंत हा विषय जात आहे.