शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडच्या दुष्काळाचा आढावा पालकमंत्री घेणार आता मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:54 IST

एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्या दुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.

ठळक मुद्दे२७ मेची बैठक रद्द २८ रोजी अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले

नांदेड : एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्यादुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. जिल्ह्याचे पालकसचिव आणि पालकमंत्र्यांनी थेट जिल्ह्यात जावून पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घ्यावा, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे पालकसचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. काही दुष्काळी भागातही त्यांनी पाहणी केली. तसेच प्रशासकीय पातळीवरही आढावा घेतला.पालकमंत्री रामदास कदम यांचाही दौरा २७ मे रोजी नियोजित होता. नांदेडमध्ये ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेणार होते. मात्र आता ऐनवेळी त्यांचा नांदेड दौरा रद्द झाला आहे.जिल्हा दुष्काळासंदर्भातील बैठक आता २७ ऐवजी २८ मे रोजी नांदेड ऐवजी मुंबई येथे मंत्रालयात घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.एकूणच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यात दुष्काळी भागांना भेटी देवून पाहणी करणे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाच्या संदर्भात प्रशासनाला आदेशित करणे आवश्यक आहे. मात्र असे न होता पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सोडून २८ मे रोजी अधिका-यांना मुंबईला जावे लागणार आहे.या बैठकीसाठी २७ मे रोजीच जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासह दुष्काळी तालुके असलेल्या देगलूर, मुखेड तसेच लोहा आणि नांदेड तहसीलदारांनाही मुंबईकडे रवाना व्हावे लागणार आहे.शेतक-यांची चिंता वाढली, नांदेड शहरही तहानलेलेचराज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांची वर्तवला आहे. ८ जूनपर्यंत तरी मान्सूनपूर्वीचा पाऊस राज्यात होणार नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे. याचा फटका पाणी टंचाई असलेल्या भागांना बसणार आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळMantralayaमंत्रालयRamdas Kadamरामदास कदम