शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

कंधार तहसीलवर मातंग समाजाचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:12 IST

गत काही वर्षापासून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे यासाठी विविध सामाजिक संघटनेनी विविध आंदोलने केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.

कंधार : गत काही वर्षापासून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे यासाठी विविध सामाजिक संघटनेनी विविध आंदोलने केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर संजय ताकतोडे या तरूणाने आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील दोघांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी ११ मार्च रोजी कंधार तहसील कार्यालयावर सकल मातंग समाजाचा वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला. याला मोठा प्रतिसाद मिळाला.११ मार्च रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावे. यासाठी विविध सामाजिक संघटनेनी अनेक आंदोलने, मेळावे, सत्याग्रह केले. लक्षवेधी हजारोंचे मोर्चे काढण्यात आले. तरीही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे साळेगाव ता.केज जि.बीड येथील संजयभाऊ ताकतोडे या तरुणाने शासनाचा तीव्र निषेध करत ५ मार्च रोजी जलसमाधी घेतली. या घटनेने ताकतोडे कुटुंब उघड्यावर पडले. मातंग समाजाचा तरुण आरक्षणासाठी गमावला. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त केला जाऊ लागला. या घटनेला मुख्यमंत्री यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ताकतोडे कुटुंबियांना एक कोटीची आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील दोन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी करावी, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, लहुजी साळवे यांचे पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे, साळेगाव येथे संजयभाऊ यांचे स्मारक उभारावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला दोन हजार कोटींचे भांडवल उपलब्ध करून द्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी कंधार येथे सकल मातंग समाजाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आले.मोर्चा साठेनगर कंधार येथून मुख्य रस्त्याने निघून महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन करत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. सकल मातंग समाज कृती समिती आयोजित मोर्चात मारोती गायकवाड, महेंद्र कांबळे, साईनाथ मळगे, केदारनाथ देवकांबळे, मालोजी वाघमारे, हणमंत घोरपडे, बाबूराव टोम्पे, बालाजी कांबळे, बंटी गादेकर, मुन्ना बसवंते, चंद्रकांत गव्हाणे, महेश मोरे, बालाजी गायकवाड, कैलास बसवंते, शिवराज दाढेल, प्रदीप वाघमारे, वैजनाथ घोडजकर, सोपान कांबळे यांच्यासह सकल मातंग समाज कृती समितीचे सदस्य आणि मातंग समाज स्त्री-पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :Nandedनांदेडreservationआरक्षणagitationआंदोलन