शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 19:45 IST

ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ): गावागावात मराठा ओबीसी वाद होणार नाही यासाठी समन्वय ठेवून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी अर्धापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण हे भाजप सरकारनेच दिलेले असून आमचा आरक्षणाला विरोध नाही. ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये यासाठी मराठा ओबीसी मानसन्मान ठेवून आरक्षणाचा मार्ग काढला पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्नशील असून मराठा आरक्षणावर योग्य मार्ग काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने युती सरकार प्रयत्नशील आहे. असे यावेळी चव्हाण म्हणाले.

दि.५  शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे  खा. अशोकराव चव्हाण व खा. संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांची भेट घेतली. हैदराबादचे गॅझेट व सातारा संस्थांनचे गॅझेटवर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकार पुढे पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो, असे जरांगे पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केल्याचे चव्हाणांनी सांगितले. 

शिंदे समिती हैदराबाद गॅझेट व सातारा गॅझेटचा अभ्यास करणार आहे. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील आहे. तर १० टक्के (एसईबीसी) आरक्षण सर्व चालू भरती प्रक्रियेत लागू झाले आहे. सरकारच्या सर्व जाहिरातीमध्ये दहा टक्के चा उल्लेखही येत आहे. असे अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील कार्यक्रमात बोलतांना खासदार चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी अमर राजुरकर, चेअरमन गणपतराव तिडके, गोविंदराव नागेलीकर, सभापती संजय देशमुख लहानकर, शामराव टेकाळे, डॉ लक्ष्मण इंगोले, बालाजी गव्हाणे, बळवंत इंगोले, सरपंच मारोतराव बुट्टे, उपसरपंच मनोहर खंदारे,डॉ.बालासाहेब बंडेवार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड