शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

सरकारने सहकार क्षेत्र काढले मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:50 AM

राज्यात आज सहकार चळवळ मोडीत निघाली का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ सहकार क्षेत्र अडचणीत आहेच, त्यात सरकारचा हस्तक्षेपही वाढला आहे़ साखरेचे भाव टिकले तरच कारखाने चालतील़

ठळक मुद्देपद्मश्री श्यामराव कदम पुतळा अनावरणअशोकराव चव्हाण यांचे टीकास्त्र

नांदेड : राज्यात आज सहकार चळवळ मोडीत निघाली का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ सहकार क्षेत्र अडचणीत आहेच, त्यात सरकारचा हस्तक्षेपही वाढला आहे़ साखरेचे भाव टिकले तरच कारखाने चालतील़ अशी परिस्थिती असताना कारखाने बंद करायचे की चालवायचे असा प्रश्न उभा असून हे सरकार सहकार क्षेत्रच मोडीत काढायला निघाले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़नांदेड येथे जिल्हा बँकेत उभारण्यात आलेल्या पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण खा़ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले़ अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण होते़ यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ पुतळा अनावरण प्रसंगी खा़ चव्हाण बोलत होते़ ते म्हणाले, सहकारी क्षेत्रातील बँकांनीही एनपीए कमी केला पाहिजे़ लातूर, पुणे येथील जिल्हा बँका उत्तम चालतात, तर नांदेडची बँकही चालली पाहिजे, असेही ते म्हणाले़ पद्मश्री कदम यांचा पुतळा हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे म्हणाले़ पवारांमुळेच आपण १९९२ ते १९९८ या कालावधीत विधान परिषदेत आलो, असे सांगताना मंत्रिमंडळातही त्यांनीच स्थान दिल्याचे ते म्हणाले़नरेंद्र मोदींनी शरद पवारांना राजकारणाची हवा कळते असे म्हटले होते़ ही बाब खरे असल्याचे सांगताना शरद पवार आज नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बळ देण्यासाठीच आल्याचे चव्हाण म्हणाले़ या आघाडीला निश्चित स्थान मिळेल़ त्याला आता विरोधकही साथ देतील असेही ते म्हणाले़ राजकारणात राज्याचे कोण, जिल्ह्याचे, तालुक्याचे नेतृत्व करावे, हे जनता ठरवते असेही त्यांनी सांगितले़यावेळी रा्ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले़ राजकारणाची हवा मला कळते, असे सांगत देशात आता हवा बदलत असून चित्र बदलत आहे़ या नव्या बदलाची नोंद घेण्याची वेळ आली आहे़ याबाबत आपल्या मनात शंका नसून ही काही वावटळ नसून ही जनमानसातील, लोकांच्या मनातील भावनांच्या पूर्ततेबाबत चर्चा सुरू झाली आहे़ नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल हे बदलत्या हवेचे द्योतक आहे़पद्मश्री श्यामराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना कदम यांची बांधीलकी ही जनतेशी, शेतकऱ्यांशी असल्याचे सांगितले़ ज्या ज्या वेळी विधिमंडळात शेतकºयांच्या विषयीचा मुद्दा असेल त्या त्या वेळी ते अत्यंत पोटतिडकीने शेतकºयांची बाजू मांडत़ कदम यांनी कृषी व औद्योगिक समाजाच्या उभारणीसाठी सूत्रे मांडली़ १९६२ मध्ये विधानमंडळात घेण्याबाबत त्यांना विचारले असता विधानमंडळात शंकरराव चव्हाण आहेत, मी जिल्ह्यावरच काम करतो अशी भूमिका त्यांनी घेतली होती़ जिल्ह्यातील जनतेचा विकास व्हावा याच भूमिकेने त्यांनी आमदारकी नाकारली, असा राज्यात एकमेव माणूस असावा असेही पवार म्हणाले़ सत्ता येते, जाते़ आज या मंचावर तीन माजी मुख्यमंत्री आहेत़ त्यामुळे सत्तेत असो वा नसो, लोकांशी बांधीलकी मात्र कायम असेल तर आपण राज्यासाठी, देशासाठी काम करू शकतो, असेही ते म्हणाले़नांदेड जिल्हा बँकेच्या परिसरात हा पुतळा उभारल्याचा आनंद असल्याचे सांगताना बँकेच्या स्थापनेपासून उभारणीत ज्यांनी योगदान दिले, त्यांचा हा पुतळा सहकार क्षेत्रात काम करणा-यांना निश्चितच प्रेरणा देणारा आहे़ असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले़ सूत्रसंचालन संतोष देवराये, विक्रम कदम यांनी केले़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकर दहीफळे यांनी आभार मानले़ यावेळी खा़डॉ़ सुनील गायकवाड, राकाँच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान, माजीमंत्री कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगावकर, गंगाधरराव कुंटूरकर, आ़ डी़ पी़ सावंत, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, डॉ़माधवराव किन्हाळकर, डी़बी़पाटील, महापौर शीला भवरे, आ़ प्रदीप नाईक, आ़ वसंतराव चव्हाण, आ़ सतीश चव्हाण, आ़विक्रम काळे, आ़प्रीतम गजभिये, आख़ाजा बेग, राकाँच्या सरचिटणीस सोनाली देशमुख, आ़ अमरनाथ राजूरकर, माजी खा़ व्यंकटेश काब्दे, माजी आ़बापूसाहेब गोरठेकर, ओमप्र्रकाश पोकर्णा यांची उपस्थिती होती़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा