राज्यपाल सी. विद्यासागर राव आज नांदेडात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:41 IST2019-06-03T00:39:53+5:302019-06-03T00:41:08+5:30

राज्यपाल सी. विद्यासागर राव हे ३ जून रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल राव हे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Governor C. Vidyasagar Rao will arrive in Nanded today | राज्यपाल सी. विद्यासागर राव आज नांदेडात येणार

राज्यपाल सी. विद्यासागर राव आज नांदेडात येणार

नांदेड : राज्यपाल सी. विद्यासागर राव हे ३ जून रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल राव हे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी सकाळी ते नांदेड येथे पोहोचणार असून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयास सकाळी ९ वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण करतील. विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास ते सकाळी १० वाजता भेट देणार आहेत.
विद्यापीठातील श्री गुरूगोविंदसिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या सेंट्रल इन्स्टट्रुमेन्टेशन सेंटर आणि प्राणीसंग्रहालयाच्या इमारतीचे ते उद्घाटन करतील. सकाळी ११ वाजता ‘आव्हान २०१९’ या कार्यक्रमास उपस्थित राहतील.

Web Title: Governor C. Vidyasagar Rao will arrive in Nanded today