शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

हे सरकार फसवे असून शेतक-यांच्या विरोधातले; अजित पवारांची लोहा येथे जोरदार टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 19:09 IST

हे सरकार शेतकरी हिताचे नसून फसवे आणि त्यांच्या विरोधातले आहे अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोहा आयोजित हल्लाबोल मेळाव्यात केले.

लोहा (नांदेड ) : शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ, कर्ज माफिची  फसवी घोषणा, शेतपंपाचे विज कनेक्शन तोडणे, शेतीला लागणा-या साधन सामुग्रीच्या किंमतीत वाढ केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे हे सरकार शेतकरी हिताचे नसून फसवे आणि त्यांच्या विरोधातले आहे अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे आयोजित हल्लाबोल मेळाव्यात केले.

शहरातील बैल बाजार मैदानात आज राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, तर व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पक्षप्रवक्ते नवाब मलीक, चित्रा वाघ, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, विक्रम काळे, कमलकिशोर कदम, प्रांजली रावनगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय पाटील क-हाळे, बाबुराव केंद्रे आदींची उपस्थिती होती. 

या प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदार संघात धरण, तलाव उभारण्याचे निर्णय कुठलाही भेदभाव न ठेवता घेतले. परंतु आजचे सरकार शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडत आहे. कर्ज माफ करण्याची घोषणा केली तिही फसवी निघाली. बेरोजगारांना नोकरी देतो म्हणाले मात्र गेल्या साडेतीन वर्षात एकालाही नोकरी दिली नाही. यामुळे हे सरकार फसवे असून पूर्णपणे अपयशी ठरलेले  आहे अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, नवाब मलिक, माजी आ. शंकरआण्णा धोंडगे यांनी सुद्धा भाषणातून सरकारवर टीका केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडे