सहा लाख दे, नाहीतर ठोकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:23+5:302021-02-05T06:10:23+5:30
मुकेश पांडुरंग लोलगे यांचे जोशी गल्ली सराफा येथे लोलगे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २९ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या ...

सहा लाख दे, नाहीतर ठोकतो
मुकेश पांडुरंग लोलगे यांचे जोशी गल्ली सराफा येथे लोलगे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. २९ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका क्रमांकावर त्यांच्या मोबाइलवर मिस कॉल आला, परंतु अनोळखी क्रमांक असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. थोड्याच वेळात त्याच्या नंबरवरून मेसेज आला. नांदेडमध्ये राहायचे असल्यास सहा लाख रुपये दे, असे त्यात नमूद होते. त्यानंतर, आणखी मेसेज पाठवून पैसे नाही दिले, तर ठोकतो, अशी धमकी दिली. यावर लोलगे यांनी पैसे कमी करण्यास सांगितले. त्यानंतर, आरोपी दोन लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाला. त्यासाठी त्याने लाेलगे यांना आपल्या बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांकही दिला. या प्रकरणात लोलगे यांनी इतवारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन एकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, शनिवारी अनिल लालवाणी यांच्यावर खंडणीसाठी सोनू नशेडी याने हल्ला केला होता. त्यानंतर, अन्य एका ठिकाणी चाकूचा धाक दाखवून दुचाकी पळवून नेत असताना तो पोलिसांच्या हाती लागला.