आयुर्षी रावसाहेब राठोड (१८) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तीने सीईटीची परीक्षा दिली होती. परंतु या परीक्षेत तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली होती. या नैराश्यापोटीच तिने घरातील छताला असलेल्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोनि.कांबळे हे तपास करीत आहेत.
कमी गुण मिळाल्याने मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST