शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

संसार सोडून दुसरे लग्न केलं, पतीने शिकवला धडा; पत्नी, दुसऱ्या पतीसह नातेवाईकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:29 IST

पहिल्या पतीने शिकवला चांगलाच धडा; न्यायालयाच्या आदेशाने पत्नी, दुसऱ्या पतीसह दोघांच्या ११ नातेवाईकांवर गुन्हा

अर्धापूर (नांदेड) : पहिल्या पतीसोबत संसार सुरू असताना, विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणे पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह ११ नातेवाइकांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर सुरेश तरटे यांचा विवाह वैशाली भीमराव भोसले यांच्यासोबत २०१९ साली झाला होता. त्यानंतर वैशाली आणि मनोहर यांना मुलगा झाला. या दोघांचा संसार सुरू असताना, वैशाली व तीन वर्षांचा मुलगा यांनी मनोहरच्या घरातून पलायन केले. मनोहर तरटे यांनी आपली पत्नी आणि मुलाचा शोध घेतला, परंतु ते त्यांना कुठेही आढळून आले नाही. दरम्यान पत्नी वैशाली हिने अंकुश सांडू शिंदे ( रा. हट्टी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याशी दुसरा विवाह केला.

याबाबत अनेक वेळा पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही आरोपी विरुद्ध कारवाई झाली नाही. अखेर मनोहर तरटे यांनी अर्धापूर न्यायालयात धाव घेतली. मनोहर तरटे यांच्याकडून ॲड. शेख आमेर शेख सगीर यांनी पुरावे देत बाजू मांडली. आरोपी पत्नी वैशाली हिने पहिल्या पतीसोबत विश्वासघात करून दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळे तिच्यासह नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश क्यू. आर. सय्यद यांनी दिले.

पत्नी, दूसरा पती अन् नातेवाईकही अडकलेफिर्यादी मनोहर तरटे यांच्या तक्रारीवरून आरोपी पत्नी वैशाली भोसले, दुसरा पती अंकुश शिंदे, आरोपी पत्नीचे वडील भीमराव भोसले, आई देवशाला भोसले, मावशी दीपाली भोसले, काका अभिमान भोसले, आजोबा जालिंदर भोसले, आजी देवकाबाई भोसले, रा. कोताळा, ता. मानवत, जि. परभणी, वैशालीच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ सुरेश शिंदे, वैशालीची दुसरी सासू कांताबाई शिंदे, वैशालीचा सासरे आजोबा सांडू शिंदे, अशा एकूण ११ इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास जमादार बोदमवाड हे करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर