शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कन्या ते नगराध्यक्षा; सुजाता एंड्रलवार यांची किनवटच्या राजकारणात गरूडझेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 19:41 IST

सुजाता एंड्रलवार या मूळच्या शेतकरी कुटुंबातील असून, त्या उच्च विद्याविभूषित आहेत.

किनवट : शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या मांडवा (कि.) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित गृहिणी, सुजाता विनोद एंड्रलवार. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने किनवट नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा होण्याचा मान मिळवला. महिला आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करत मांडवा ते किनवट नगरपरिषद असा एक प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला असून, त्या शहराच्या दुसऱ्या महिला नगराध्यक्षा ठरल्या आहेत.

सुजाता एंड्रलवार या मूळच्या शेतकरी कुटुंबातील असून, त्या उच्च विद्याविभूषित आहेत. २००७ मध्ये महिला आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळाली. त्यावेळी गोकुंदा जिल्हा परिषद गटातून त्यांनी ‘उद्धवसेना’ उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या जनसंपर्कामुळे आणि विकासकामामुळे त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली. विशेष म्हणजे, सुरुवातीपासून आजतागायत त्यांनी उद्धवसेनेशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे.

कौटुंबिक पाठबळ आणि राजकीय वारसा...सुजाता एंड्रलवार यांच्या यशामागे कौटुंबिक पाठबळ देखील तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचे चिरंजीव करण एंड्रलवार हे उद्धवसेनेचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. या सक्रियतेमुळे त्यांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची अधिक ऊर्जा आणि दिशा मिळत गेली.

उच्च शिक्षणाचा प्रशासकीय कामात फायदा...एक गृहिणी ते लोकप्रतिनिधी अशा प्रवासात सुजाता एंड्रलवार यांनी आपल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर केला. उच्चशिक्षित असल्याने त्यांना प्रशासकीय कामकाज समजून घेणे आणि जनतेचे प्रश्न मांडणे सोपे गेले. किनवट नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तत्पर निवडणूकदरम्यान उद्धवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुजाता एंड्रलवार यांनी वचननामा जाहीर केला. वचननाम्यात नमूद केलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी तत्पर असून, माझ्या कार्यकाळात किनवटच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्षा एंड्रलवार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's Daughter to Mayor: Sujata Endralwar's Soaring Kinwat Success

Web Summary : Sujata Endralwar, from a farming family, became Kinwat's mayor, showcasing women's empowerment. Winning through reservation, her journey from Mandwa village highlights dedication. Her focus: Kinwat's comprehensive development and resolving citizen issues.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Nandedनांदेड