अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास दुःखापासून मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:52+5:302021-05-27T04:19:52+5:30
बुद्ध जयंतीनिमित्त पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन २२ ते २६ मे या कालावधीत करण्यात आले होते. व्याख्यानमालेचा ...

अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास दुःखापासून मुक्ती
बुद्ध जयंतीनिमित्त पाच दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन २२ ते २६ मे या कालावधीत करण्यात आले होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ झेन मास्टर सुदस्सन यांनी केला. व्याख्यानमालेचे चौथे पुष्प भदंत पंय्याबोधी थेरो यांनी गुंफले. ते म्हणाले की, जगात दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आहे. हे कारण म्हणजे तृष्णा किंवा वासना होय. वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय आहे. त्यांनी अंगुलीमाल, राजा प्रसेनजित, पटाचारा, किसा गौतमी यांची उदाहरणे दिली. व्याख्यानमालेत झेन मास्टर सुदस्सन, डॉ. प्रकाश खरात, डॉ. वंदना महाजन, भदंत पंय्याबोधी थेरो यांनी बुद्धांविषयीचे सखोल चिंतन मांडले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे पदाधिकारी अरविंद निकोसे, सीमा मेश्राम, संजय डोंगरे,छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे यांनी परिश्रम घेतले.