शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना डॉक्टरांतर्फे मोफत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:28 IST

जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़

नांदेड : जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीला नाम ही संघटना धावून आली असून आता या सामाजिक उपक्रमात योगदान देण्यासाठी नांदेडचे नामवंत डॉक्टर्सही पुढे आले आहेत़ नामच्या वतीने हे डॉक्टर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क आरोग्य सेवा देणार आहेत़ त्यासाठी नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉक्टरांची बैठकही घेण्यात आली आहे़

नाम फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यात अनेक कामे सुरु आहेत़ त्यासाठी स्वयंसेवी संघटनांकडून भरभरुन मदत करण्यात येत आहे़ त्यात आता नांदेडातील नामवंत डॉक्टरांनीही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या सुदृढ आरोग्यासाठी निर्धार केला आहे़ यासंदर्भात इमा भवन येथे बैठक घेण्यात आली़ या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शहरातील नामवंत डॉक्टर्स, रुग्णालये नि:शुल्क सेवा पुरविणाऱ आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने तालुकानिहाय दुर्गम व अतिगरजेच्या ठिकाणी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ रुग्णांची रक्त तपासणी, दंत तपासणी, समुपदेशन व जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत़ डॉ़ आश्विन लव्हेकर यांच्या पुढाकाराने टेलीमेडीसीनद्वारे बहिरेपणा तपासणी व निदान करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे़ 

सर्वसामान्य रुग्णांसाठी जेनेरिक औषधींची उपलब्धता करुन देण्याची जबाबदारी डॉ़ हंसराज वैद्य व डॉ़आश्विन तळणीकर यांनी घेतली आहे़ तर डॉ़ येळीकर यांच्या रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची आरोग्यविषयक जबाबदारी आधारचे डॉ़ प्रदीप जाधव, डॉ़सुरेश कदम, डॉ़ संजय कदम यांनी घेण्याचे मान्य केले आहे़ तर डॉ़दत्ता मोरे हे दंत चिकित्सा व निदान करणार आहेत़ अशाप्रकारे शहरातील नामवंत डॉक्टरांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे़ 

यावेळी झालेल्या बैठकीला नामचे जिल्हा समन्वयक डॉ़ अशोक बेलखोडे, प्रा़ डॉ़ बालाजी कोम्पलवार, आयएमचे अध्यक्ष डॉ़सुरेश कदम, नामचे सल्लागार दीपनाथ पत्की, डॉ़ बी़ जी़ मोरे, राठोड, पांडुरंग कंधारे, प्रा़ उमेद महाजन, गायकवाड, राजकुमार जाधव यांची उपस्थिती होती़ दरम्यान, नामच्या वतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांवर स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने शिबिरे चालविण्यात येतात़ त्याला आता तज्ज्ञ डॉक्टरांची जोड मिळणार आहे. नामच्या पदाधिकाऱ्यांसोबत इमाची बैठक घेण्यात आली आहे़ या बैठकीत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा देण्यासाठी अनेक नामवंत डॉक्टर पुढे आले आहेत़ याबाबत आणखी एक बैठक होणार असून कार्यक्रमाची रुपरेषा ठरविणार असल्याची माहिती इमाचे अध्यक्ष डॉ़ सुरेश कदम यांनी दिली़ 

टॅग्स :doctorडॉक्टरFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याFamilyपरिवार