प्रलोभनाच्या संदेशाद्वारे माहिती घेवून होत आहे फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:06+5:302021-07-26T04:18:06+5:30
सहजतेने मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध झाल्याने प्रत्येकाच्या हाती अत्याधुनिक मोबाईल आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक संदेश प्राप्त ...

प्रलोभनाच्या संदेशाद्वारे माहिती घेवून होत आहे फसवणूक
सहजतेने मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध झाल्याने प्रत्येकाच्या हाती अत्याधुनिक मोबाईल आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक संदेश प्राप्त होत आहेत. त्यात वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत. अँप्लिकेशनच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती घेऊन थेट बँकेत हात घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कर्ज देण्याच्या नावाखालीही अनेक संदेश पाठविले जात आहेत. त्यातूनही फसवणूक सुरू आहे. यापासून आता सावध राहण्याची गरज आहे.
एटीएम कार्ड ब्लॉक झाले. तसेच क्रेडिट कार्डची रक्कम वाढली व बँकेचे केवायसी राहिले अशा एसएमएसच्या माध्यमातूनही फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक खाजगी कर्ज पुरवठा करणाऱ्या ॲपकडून एसएमएसचा भडीमार केला जातो.
त्वरित कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लुबाडले जात आहे. मोबाईलवर मेसेज पाठवून सामान्य नागरिकाला कर्ज देण्यात येईल, असे सांगितले जाते. त्यासाठी आवश्यक ती माहिती विशेषत: आधार व बँकेची माहिती मागितली जाते. यातून बँक खाते रिकामे होते.
अशी होते फसवणूक
n मोबाईलवर आलेल्या संदेशात कर्ज कालावधी ७ दिवस, १५ दिवस, १ महिना या कालावधीसाठी १ हजार ते २० हजारपर्यंतची रक्कम आलेल्या एका लिंकवर क्लिक केल्यावर देण्याचे आमिष दाखविले जात आहे.
n कोरोना काळात बेरोजगार आहात? नवा व्यवसाय सुरू करा? असे सांगूनही अनेकांना गंडविले जात आहे. व्यवसायासाठी शुल्क म्हणून रक्कम उकळली जात आहे.
सायबरकडे तक्रार नाही
मोबाईल ॲपद्वारे अनेकांची फसवणूक होत आहे. मात्र नागरिक माहितीअभावी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. झालेल्या सर्व प्रकाराची माहिती, तांत्रिक पुरावे प्राप्त झाल्यास कारवाई होऊ शकते.
-राजेश आलेवार, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल, नांदेड.
ॲप डाऊनलोड करताच बॅंक खाते साफ
मोबाईलमध्ये कोणतेही ॲप्लिकेशन घेताना आपण परवानगी देत असतो. त्याच परवानगीच्या साहाय्याने मोबाईलमधील वैयक्तीक माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती पडत आहे.
कोणतेही नवे ॲप्लिशकेशन घेतल्यानंतर त्या ॲपद्वारे परवानगी मागितली जाते. ही परवानगी धोकादायक ठरते.