शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

पुनर्भरण योजनेचा विसरभोळेपणा

By admin | Updated: February 12, 2015 13:42 IST

दुष्काळ काळात पाण्याचे पुनर्भरण केलेल्या बोअरचे पाणी मात्र अद्यापही आटले नाही. त्यामुळे महापालिकेकडून पुन्हा पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

भारत दाढेल /नांदेड

विष्णूपुरी प्रकल्पात पुढील दोन महिने पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. आतापासूनच उन्हाळ्याच्या भीषण पाणीटंचाईचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले आहे. यंदा अल्पपावसामुळे भूगर्भातील पाणापातळीही डिसेंबरअखेर खालावली आहे. अशा या दुष्काळ काळात पाण्याचे पुनर्भरण केलेल्या बोअरचे पाणी मात्र अद्यापही आटले नाही. त्यामुळे महापालिकेकडून पुन्हा पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सन २00४ ते 0५ या काळात महापालिकेने शहरात छतावरील पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी नांदेडकरांना आवाहन केले होते. त्यासाठी मालमत्ता करात सुटही देण्यात आली होती. त्यामुळे पाच हजारांहून अधिक नागरिकांनी पुनर्भरण करून योजनेचा लाभ घेतला होता. विशेषत: तरोडा खु. व तरोडा बु. या भागातील नागरिकांनी सर्वाधिक पुनर्भरण केले होते. परंतु त्यानंतर या उपक्रमाचा विसर महापालिका व शहरवासियांनाही पडला. या दहा वषार्ंत पुनर्भरणाचे प्रयोग करण्यासाठी मनपाने कोणतेही पाऊल उचलले नाही. टंचाईमुळे आता पाण्याचे महत्व कळू लागल्याने पुनर्भरण केलेल्या विहिरी किंवा बोअरची आठवण सर्वांनाच होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीने पुनर्भरण योजना राबविण्याची मागणी महिला व बालकल्याण समितीच्या माजी उपसभापती अनुजा तेहरा यांनी केली आहे. स्थायी समितीचे सभापती विनय गिरडे यांनी, शहरात पुनर्भरणा विषयी जनजागृती करणे गरजेचे असून यापूर्वी राबविलेल्या योजनेचा अभ्यास करून लवकरच या पद्धतीने नियोजन करण्याची शिफारस करण्यात येईल, असे सांगितले.

फायदे - भूगर्भजल पातळीत वाढ होऊन विंधन विहिरी उन्हाळ्यातही कोरड्या पडत नाही. १000 चौरस फूट छताद्वारे नैसर्गिक भूजलाबरोबरच १00000 लिटर्स पाणी कृत्रिमरित्या पुनर्भरणानंतर मिळू शकते. अतिशय कमी खर्चिक योजना व कायमस्वरूपी रचना. पाण्याचा खारेपणा व जडपणा घालवते. पाणी पिण्यास योग्य असते. शहरातील काही भागात कधीकाळी हातपंप बसविण्यात आले होते. पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्याने हातपंप बंद अथवा नादुरुस्त अवस्थेत आहेत. महापालिकेच्या वतीने तीन दिवसाला एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना कायमस्वरुपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हातपंप दुरुस्त केल्यास सोयीचे होईल.

■ पावसाचे पाणी,नदीचे व ओढय़ाचे पाणी साठविणे, त्याचे पुनर्भरण करणे, आंघोळीचे पाणी, कपडे धुण्याचे पाणी, भांडे धुण्याचे पाणी साठवून ते जमिनीत जिरविणे किंवा त्याची प्रक्रिया करून पुनर्वापर करणे काळाची गरज आहे. सध्या काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. मात्र आगामी काळासाठी पाण्याचे नियोजन करावे लागेल.

 

■ दिवसेंदिवस भूगर्भातील पाणीपातळी खोल- खोल जात आहे. पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. प्रत्येक नागरिाकाने पाण्याच्या वापराबाबत, बचतीबाबत व पुनर्भरणाबाबत अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे.

पुनर्भरण करा...पाणी वापरा

पावसाळ्यात छतावर पाणी पडते. ते पाणी देवास फिल्टर बसवून ते बोअरमध्ये साठवायला हवे व त्याचा वापर करायला हवा. घराच्या चारही बाजूने मोठे खंदक खोदून सिमेंटच्या टाक्या बांधून साठवायला हवे व त्याचा वापर करायला हवा. इस्त्रायल देशात केवळ ८ ते १0 इंच पाऊस पडतो. परंतु हे सर्व पाणी ते नागरिक साठवून ठेवतात. त्याचे पुनर्भरण करतात व पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी, शेतीसाठी पाणी म्हणून त्याचा वापर करतात. आपल्या भागात ५0 ते ६0 इंच पाऊस पडतो व तो वाहून जातो. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपायोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी छतावरील पाण्याचे पुनर्भरण पाणीटंचाईवर पूर्णपणे मात करू शकते. देवास फिल्टर योजनामध्य प्रदेशच्या देवास या शहरात छतावरील पाण्याचे पुनर्भरण मोठय़ा प्रमाणावर नागरिकांनी केले आहे. त्यामुळे या योजनेला 'देवास' हे नाव पडले आहे. ही पद्धत पुढीलप्रमाणे- पावसाळ्यात छतावर पडणारे पावसाचे पाणी साध्या पाईपच्या माध्यमातून आपल्या घराच्या अंगणात किंवा अंगणाबाहेर असलेल्या विंधन विहिरीमध्ये सोडण्यात येते. त्यामधील सोडलेले पाणी भूगर्भात खोलवर जाते व भूगर्भातील रिकाम्या झालेल्या पाणीसाठय़ाच्या पोकळीमध्ये प्रवेश करते. पाण्याचा साठा त्या ठिकाणी निर्माण होतो. ६ इंची ५ ते ७ फूट पाईप जसे इमारतीचे क्षेत्रफळ असेल त्याप्रमाणे देवास फिल्टर तयार करण्यात येतो. त्यात वाळूचा थर व एका बाजूस कोळसा व जाळी टाकून बंद करून निर्माण करावेत. छतावरील पावसाचे पाणी ज्या मार्गाने येते त्याबाजूस ६ मि. मी. आकाराचा कोळसा ६ मि. मी वाळूचे खडे याचा थर द्यावा व त्यापुढे जाळी लावावी. त्यानंतर वाळूतीलच मध्यम आकारापेक्षा मोठे गोटे ३0 मि. मी. चा थर द्यावा, त्यापुढे जाळी टाकून पाईपद्वारे हे पाणी विंधन विहिरीत सोडता येते. त्याचा लाभ सोयीप्रमाणे घेता येतो.