शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

खिचडीत पाल शिजली; नांदेडमध्ये मध्यान्ह भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 5:56 PM

८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे 

ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बिलोली (नांदेड ) : तालुक्यातील सगरोळी येथिल संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री.छञपती हायस्कुलच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सगरोळीच्या श्री.छञपती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (दि.२४ ) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थिनीने शिक्षकांना खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला. शिक्षकांनी ५६ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात लागलीच दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली. 

८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर उपचार घेत असलेल्या शिवलिंग शंकर शबेटमोगरे वय १२ वर्षे, श्रिकांत विठ्ठल मांगीलवार वय १२ वर्षे, पूजा संतोष गायकवाड वय १४ वर्षे, विजय साहेबराव अंजनबाई वय १३ वर्षे, मनोज संजय गरबडे वय १४ वर्षे, सौंदर्य विनायक शिंदे  वय १४ वर्षे, स्वामी मन्मथ स्वामी वय १४ वर्षे, महाळसा लक्ष्मण रामटक्के वय १३ वर्षे या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाNandedनांदेडhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी