खिचडीत पाल शिजली; नांदेडमध्ये मध्यान्ह भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 18:00 IST2019-07-24T17:56:17+5:302019-07-24T18:00:03+5:30

८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे 

Food poisoning to 56 students through mid day mill in Nanded | खिचडीत पाल शिजली; नांदेडमध्ये मध्यान्ह भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

खिचडीत पाल शिजली; नांदेडमध्ये मध्यान्ह भोजनातून ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा

ठळक मुद्देविद्यार्थ्यांवर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बिलोली (नांदेड ) : तालुक्यातील सगरोळी येथिल संस्कृती संवर्धन मंडळाच्या श्री.छञपती हायस्कुलच्या मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे शाळेतील ५६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सगरोळीच्या श्री.छञपती हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना बुधवारी (दि.२४ ) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी देण्यात आली. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थिनीने शिक्षकांना खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला. शिक्षकांनी ५६ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात लागलीच दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली. 

८ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर 
उपचार घेत असलेल्या शिवलिंग शंकर शबेटमोगरे वय १२ वर्षे, श्रिकांत विठ्ठल मांगीलवार वय १२ वर्षे, पूजा संतोष गायकवाड वय १४ वर्षे, विजय साहेबराव अंजनबाई वय १३ वर्षे, मनोज संजय गरबडे वय १४ वर्षे, सौंदर्य विनायक शिंदे  वय १४ वर्षे, स्वामी मन्मथ स्वामी वय १४ वर्षे, महाळसा लक्ष्मण रामटक्के वय १३ वर्षे या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Web Title: Food poisoning to 56 students through mid day mill in Nanded