पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीस पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:38 PM2018-01-07T23:38:45+5:302018-01-07T23:38:49+5:30

कापडाचे दुकान चालविण्यासाठी माहेराहून पैसे घेवून येण्याच्या मागणीला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली़ ही घटना उमरी येथे घडली़ याप्रकरणी भोकर न्यायालयाने आरोपी पतीस पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़

 Five-year sentence for the wife's death | पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीस पाच वर्षांची शिक्षा

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीस पाच वर्षांची शिक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कापडाचे दुकान चालविण्यासाठी माहेराहून पैसे घेवून येण्याच्या मागणीला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली़ ही घटना उमरी येथे घडली़ याप्रकरणी भोकर न्यायालयाने आरोपी पतीस पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़
उमरी येथील संगीता सूर्यकांत राहूलवार या विवाहितेला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता़ कापड दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळीकडून त्यांना माहेराहून एक लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात येत होती़, परंतु माहेरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे संगीता या त्यांची मागणी पूर्ण करु शकत नव्हत्या़ त्यामुळे नेहमी होणाºया या त्रासाला कंटाळून संगीता यांनी विष प्राशन केले होते़ उपचारासाठी त्यांना नांदेडातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
या प्रकरणात भोकरचे न्या़ शेख यांनी आरोपी पती सूर्यकांत राहूलवार याला विवाहितेचा छळ आणि मृत्यूस कारणीभूत या कलमाखाली दोषी ठरवित पाच वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़ या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली़

Web Title:  Five-year sentence for the wife's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.