शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

गुरुद्वारा बोर्डाची पहिली बैठक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:42 AM

सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासनाकडून अध्यक्षांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाचा शीख समाजाकडून विरोध होत असताना बोर्डाची पहिली बैठक १ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती़

ठळक मुद्देशीख समाजाचा विरोध प्रशासनाने आचारसंहितेचे दिले कारण

नांदेड : सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासनाकडून अध्यक्षांची नियुक्ती केल्याच्या निर्णयाचा शीख समाजाकडून विरोध होत असताना बोर्डाची पहिली बैठक १ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती़ या बैठकीलाही शीख समाजातील अनेकांनी विरोध केला होता़ त्यानंतर प्रशासनाने आचारसंहिता असल्याचे कारण देत ही बैठक रद्द केली़सचखंड गुरुद्वारा बोर्डावर यापूर्वी निवडून गेलेल्या सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्याची परंपरा होती़ परंतु राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या नियमामध्ये बदल केला़ त्यामधील कलम ११ नुसार गुरुद्वारा बोर्डावर अध्यक्ष निवडीचे अधिकार शासनाने आपल्याकडे घेतले होते़ त्यानंतर गुरुद्वारा बोर्डावर शासनाने अध्यक्षांची निवड केली होती़ या निवडीला शीख समाजातून मोठा विरोध करण्यात आला़पंजप्यारे साहिबान यांनीही अशाप्रकारे गुरुद्वाराच्या कामकाजात शासनाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला होता़ अध्यक्षांच्या निवडीनंतर १ एप्रिल रोजी अडीच वाजता एस़जी़पी़सी़ विश्रामगृह येथे पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती़परंतु, या बैठकीच्या आयोजनालाही विरोध दर्शविण्यात येत होता़ या बैठकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो अशा आशयाचे निवेदनही कुलप्रितसिंग कुंजीवाले या सदस्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले होते़ त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला़त्यामध्ये आचारसंहिता असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्च रोजी ही बैठक रद्द केल्याचे पत्र काढले़ त्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरु असून बैठकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती़ पुढे होणाऱ्या बैठकीची तारीख कळविण्यात येईल, असेही त्यात नमूद आहे़

टॅग्स :nanded-pcनांदेडSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेड